गोव्यात धार्मिक मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू…

पणजी (गोवा): उत्तर गोव्यात एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून, ३० जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर गोव्यातील शिरगाव येथे लेराई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी श्री लेराई जत्रा आयोजित केली जात असून दरवर्षी हजारो भाविक या जत्रेला येत असतात. यावर्षीही २ मे रोजी रात्री श्री लैराई देवीची मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये ४० ते ५० हजार नागरिक सहभागी झाले होते. देवीची मिरवणूक सुरू असताना एका ठिकाणी उतार असल्याने नागरिकांना गर्दीत एकत्र चालणे कठीण झाले. यावेळी ढकलाढकली आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी रात्री चेंगराचेंगरी सुरू झाल्यानंतर लोक एकमेकांवर पडू लागले. ज्यात अनेक जण चिरडले गेले. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.ते म्हणाले, ‘ही घटनी खूप दुःखद आहे. जखमींच्या उपचारांसाठी आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.’

गोव्यात युवतीवर पाच जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार…

गोव्यामध्ये मध्यरात्री गुगल मॅप लावून मित्र-मैत्रीण फिरत होते अन् पुढे…

अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…

माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून घुसला महिलेच्या घरात; बेदम मारलं…

पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!