
पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…
पुणे : पुणे शहरा जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विठ्ठल पोळेकर हे गुरुवारी सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला होते. त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार विठ्ठ्ल पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर आज विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे तुकडे खडकवासला धरणाच्या पाण्यात ओसाडे गावच्या हद्दीत आढळून आले आहेत. निवडणूक काळात घडलेल्या या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड बाबू मामे याने काही दिवसांपुर्वी विठ्ठल पोळेकर यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जॅग्वार कार किंवा दोन कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली होती. परंतु ही मागणी पूर्ण न केल्याने त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.
दरम्यान, खडकवासला पोलिस विठ्ठल पोळेकर यांच्या हत्येचा तपास करीत आहे. बाबु मामे आणि विठ्ठ्ल पोळेकर यांचे काय कनेक्शन होते? अशा अंगाने देखील पोलिस तपास करीत आहेत.
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…
प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…
पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…
पुणे जिल्ह्यात कारचा टायर फुटल्याने काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू…

