ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…
मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याच्या चेन्नईत मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली. ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण, ललित पाटील याने एक चूक केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पुणे पोलिस ललित पाटील याच्या मागावर असताना साकीनाका पोलिस ललित पाटीलसाठी सापळा रचत होते. साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ललित पाटील अलगद जाळ्यात फसला. साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटील याने नव्या नंबरवरून कॉल केला आणि तिथेच तो फसला. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी प्रचंड गोपनीयता बाळगत तीन पथके ललित पाटील याच्या शोधासाठी तयार केली. दरम्यान, ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत असे. त्यावरून पोलिसांना ललित पाटील याच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतले आहे. लवकरच त्याला महाराष्ट्रात आणले जाणार असून न्यायालयात हजर केले जाणार आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी दहा पथके तयार करण्यात आली होती.
दरम्यान, ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटील याच्या मुसक्या आवळल्या. ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्सप्रकरणातील अनेक बड्या धेंडांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती.
ड्रग्स तस्करी प्रकरणात ससून रुग्णालयातील पोलिस लॉकअपमध्ये असणाऱ्या आरोपी ललित पाटीलने संशयास्पदरित्या पलायन केल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर एका अधिकाऱ्यासह 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले होते. आरोपी ललित पाटील हा ड्रग्स तस्करीमधील मोठा डिलर असून तो अंमली पदार्थ उत्पादकांकडून मेफेड्रॉन अंमली पदार्थ घेऊन ते हायप्रोफाईल लोकांना विक्री करुन पैसे कमवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. नाशिकमध्ये एका नामांकित राजकीय पक्षाकडून त्याने नगरसेवक पदाची निवडणूक देखील लढवली होती परंतु, त्यामध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला होता.
कसा केला पुणे ते चेन्नई प्रवास…
ललित पाटीलला पळून जाण्यासाठी एका बडा नेत्याचा हात असल्याचे आरोप होत होते. सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू होते. या दरम्यान ललित पाटील एका ट्रॅव्हल कंपनीच्या कारने दोन सहकाऱ्यांसह आधी गुजरात, धुळे मग कर्नाटक आणि नंतर चेन्नईला पोहचला. या सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. अखेर एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.
साकीनाका पोलिसांनी केलेल्या कारावाईचे कौतुक…
स्थानिक पातळीवर पोलिस आणि डॉक्टरांचे घट्ट जाळं ललित पाटील याने स्वतःच्या बचावासाठी विणले होते. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा तो भाग होता. त्यातूनच मलेशिया आणि थायलंड सारख्या देशांमध्ये त्याने मेफेड्रोन पाठवल्याच समोर आले होते. हे ड्रग सिंडिकेट तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतच आहे. शिवाय तो कधी सापडूच नये असे वाटत होते. ललित पाटील याला वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न होत असताना साकीनाका पोलिसांनी केलेल्या कारावाईचे कौतुक होत आहे.
ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…
ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…
ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…
ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…
ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!