Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…

पुणे (संदिप कद्रे): शेअरमार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन लाभांश देण्याचे बहाण्याने जेष्ठ नागरिकाची ०१ कोटी ६० लाख रुपयांच्या फसवणुक करणाऱ्या ०६ आरोपींना सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर यांनी सापळा रचून पकडले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यातील जेष्ठ नागरिक यांना व्हॉट्सअॅप कॉलव्दारे शेअर मार्केट इन्व्हेसमेंटबाबत अनन्या गुप्ता महिलेने संपर्क करुन (G5) UP stox value-added technical information sharing, Rajat Parmar Growth Visionary Blinkx PEI, (132) Star Alliance या वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये अॅड करुन वेळोवेळी मो.क्रमांक- +९१७७२५९९७६८१, रजत परमार व्हाट्सअॅप मोबाईल क्रमांक- +९१८७९१५९७६५६, +९६३३५४५६३९,+७९९५१४८२३२, +९१६३६६२०३५६२, +९१६३६६२०३५६२, हरी माथूर व्हाट्सअॅप मोबाईल क्रमांक- +९१९९८१३७४६४३ यावरुन संपर्क साधुन शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन चांगला परतवाना मिळेल असे सांगुन अनेक बँक अकाउंटवर ०१ कोटी ६० लाख रुपये वेळोवेळी भरण्यास प्रवृत्त करुन आर्थिक फसवणुक केली म्हणून सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नं ३९ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४),३१९(२),३१६(५), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल असून त्याचा तपास सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर येथून चालू आहे.

संबंधित गुन्ह्याचा तत्परतेने तपास करीत असताना आरोपी यांनी गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेतली असल्याने तपास करताना पुण्यातील वाघोली येथील आयडीएफसी बँक खात्यात दि.१७/०३/२०२५ रोजी ०५,८२,०००/- रक्कम चेकव्दारे विथड्रॉल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. तेव्हा क्षणाचा विलंब न करता सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर बँक खात्याचे खातेधारक आरोपी केतन भिवरे (रा. खराडी, पुणे) यास ताब्यात घेतले. गुन्ह्यातील बँक खाते व मोबाईल क्रमांक यांचे तांत्रिक तपास केला असता, त्यात आरोपी आरोपी गोविंद सुर्यवंशी (रा वाघोली, पुणे मुळ रा हिंगोली) व आरोपी रोहित कंबोज, रा वाघोली, पुणे मुळ रा. पंजाब, आरोपी ओमकार भवर, रा वाघोली, पुणे मुळ रा. हिंगोली, आरोपी जब्बरसिंह पुरोहित, रा च-होली, पुणे मुळ रा. धारावी, मुंबई यांचा सहभाग असल्याचे दिसल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.

आरोपी गोविंद सुर्यवंशी हा पुण्यातील वाघोली परिसरातील विघ्नेश्वर मल्टीस्टेट को. ऑप. बँकेचा संचालक असुन या बँकेच्या टेक्निकल कामात आरोपी रोहित कंबोज काम करत असल्याने त्याचा फायदा घेतला आहे. दोघे बी.टेक, उच्च शिक्षित असुन त्यांच्या डिगीव्हेंटरी वननेस, रजत सेल अशा डिजिटल मार्केटिंग नावाच्या कंपन्या आहेत. आरोपी गोविंद सुर्यवंशी व रोहित कंबोज हे दोघे क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारामध्ये सक्रिय असुन त्यांनी त्याव्दारे अनेक युएसडीटी आरोपी जब्बरसिंह पुरोहित, रा च-होली, पुणे मुळ रा. धारावी, मुंबई दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच गुन्ह्यातील बँक खाते बनवुन त्याचा पुरवठा करणारा आरोपी निखिल ऊर्फ किशोर सातव, राहणार वाघोली, पुणे यास देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

सर्व ०६ आरोपी यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांची एकुण १२ दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. आतापर्यत झालेल्या तपासात यातील आरोपींनी सायबर गुन्हा करताना सुमारे १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केला असुन नॅशनल सायबर पोर्टलवर त्यांच्या विरुध्द वेगवेगळ्या राज्यात एकुण २९ तक्रारी असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे पुणे सायबर पोलिसांना संपुर्ण भारतातील २९ तक्रारी / गुन्हे उघडकिस आणण्यात यश मिळालेले आहे. आरोपीचे दुबई, गुजरात, वेस्ट बंगाल या ठिकाणी कनेक्शन असल्याचे तपासात निष्पन्न असुन सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर येथील पथक गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, पुणे शहर, अपर पोलिस आयुक्तशैलेश बलकवडे (गुन्हे) पुणे शहर, पोलिस उप-आयुक्त श्री विवेक मासाळ, आर्थिक व सायबर पुणे शहर, सहाय्यक पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे, आर्थिक व सायबर पुणे यांचे मार्गदर्शनाखाली स्वप्नाली शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर, पोलिस उप-निरीक्षक संदिप कदम, पोउपनि तुषार भोसले, पोहवा चव्हाण, पोहवा ०९२१ मुंढे, पोहवा कोंडे, पोशि. ८४३९ संदिप पवार, पोशि. १०१०७ दिनेश मरकड, पोशि २६२७ यादव, पोशि १०७१६ नागटिळक, पोशि ९९०७ सचिन शिंदे, पोहवा जमदाडे, पोहवा सोनुने, सर्व नेमणुक – सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर आणि ( विशेष सहाय्य पोउपनि मेमाणे, चतुःश्रृंगी पो.स्टे. पुणे शहर) यांनी सदरची कामगिरी केली आहे.

सायबर चोरट्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून निवृत्त अधिकाऱ्याची पत्नीसह आत्महत्या…

Cyber Crime! ‘गुगल’वर सर्च केले हॉटेल अन् दोन लाखांची झाली फसवणूक…

पुणे! कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये फिर्यादीस दिले परत मिळवून…

एटीएम कार्ड बदलून खात्यातून पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक…

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…

डिजिटल अरेस्टसाठी तोतया पोलिस अधिकाऱ्याचा VIDEO कॉल अन् युवकाची शक्कल…

धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…

Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…

नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…

Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…

पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…

Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…

Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…

युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…

सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…

महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!