कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दमधील खुनाच्या गुन्ह्यात एकाला जन्मठेप…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दमधील खुनाच्या गुन्ह्यात एकाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

कोंढवा पोलिस ठाणे या ठिकाणी सन २०१९ मध्ये मृत सुनिल रघुनाथ शास्त्री (वय ५२) हे ओला कंपनीत त्याची स्विफ्ट डिझायर कार नंबर एम. एच. १२ / क्य. जी. / ८९८७ चालवीत होता. त्यावेळी आरोपी तपीश पुखराज चौधरी (वय २२, सध्या रा. गगन उन्नती सोसायटी, शॉप नंबर १८, इसकॉन मंदिरा शेजारी, कोंढवा पुणे मुळ गाव ३२ बी, न्यू पाली रोड, भगत कोठी, जोधपुर, राजस्थान) याने त्याच्या मोबाईलवरून सिध्दार्थ सिंग या नावाने दिनांक २२/०६/२०१९ रोजी रात्री मृत सुनिल शास्त्री याची स्विफट डिझायर कार पुरंदर कॉलनी, रायगड कॉलनी, यशवंतनगर, रहाटणी पुणे येथुन बुक केली. प्रवासी म्हणून गाडीत बसुन सुनिल रघुनाथ शास्त्री यांना कात्रज कोंढवा रोड, इस्कॉन मंदिराजवळ, केसर लॉजचे मागील मोकळ्या मैदानात नेवुन तेथे कापडी गमच्छाने सुनिल शास्त्री यांचा गळा जोरात आवळून त्यांचा खून केला. त्यांचा मृतदेह तेथेच मैदानात टाकुन सुनिल शास्त्री यांचे ताब्यातील ओला कंपनीची स्विफट डिझायर कार नंबर एम.एच.१२ / क्यु.जी / ८९८७ व मोबाईल फोन चोरी करून गुन्हा केला होता. संबंधित गुन्हा हा आरोपी याने केल्याचे १२ तासाच्या आत निष्पन्न करून गुजरात येथून अटक केली होती.

सदर आरोपी याच्या विरूध्द सबळ पुरावे गोळा करून तात्कालीन तपासी अधिकारी सहा पोलिस निरीक्षक चेतन मोरे व पोलिस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांनी सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. नमुद गुन्ह्यातील ३० साक्षीदार व भौतीक पुराव्यांचे तपासणी करून आरोपी याने गुन्हा केल्याचे सबळ पुरावे गुन्ह्यात उपलब्ध असल्याने आरोपीला भारतीय दंड संहिता कलम ३०२ मध्ये जन्मठेप व २५,०००/- रूपये दंड, दंड नभरल्यास दोन वर्षाचा कारावास तरोच भारतीय दंड संहिता कलम ३९७ मध्ये ७ वर्षे शिक्षा व १०,०००/- रूपये दंड त्याचप्रमाणे भारतीय दंड संहिता कलम २०१ मध्ये ३ वर्षे शिक्षा व १५,०००/- रूपये दंड व दंड नभरल्यास ६ महिने कारावास तसेच मयताच्या नातेवाईकास २ लाख रूपये देण्याचा आदेश श्री. महाजन, मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांनी दिला आहे.

संबंधित प्रकरणात विशेष मार्गदर्शन मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपआयुक्त परिमंडळ ५, सहा पोलिस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, पोलिस निरीक्षक अब्दुल रौफ शेख यांनी केले असून सरकारी अभियोक्ता मिलींद दातरंगे, प्रदीप गहलोत यांनी काम पाहीले त्याच प्रमाणे कोर्ट पैरवी म्हणुन सहा पोलिस उपनिरीक्षक महेश जगताप, पोलिस हवालदार विजय माने यांनी काम पाहीले आहे.

पुणे! आईने 10 वर्षांनी झालेल्या दोन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं अन्…

पुणे शहरात भूतानच्या युवतीवर सामूहिक अत्याचार…

पुणे शहरात मैत्रिणीने कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून केला विश्वासघात…

पुणे शहरात घरफोडी करणारा परराज्यातील अटल गुन्हेगार जेरबंद…

Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!