दीड कोटी जिंकलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई…

पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम 11 गेममध्ये दीड कोटी जिंकले होते. पोलिसांनी सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार गठित केलेल्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या चौकशी समितीने ही कारवाई केली. ऑन ड्युटी असा खेळ खेळणे गैरवर्तणुकीची कृती असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पण विभागीय चौकशीत त्यांना स्वतःचे म्हणणे मांडण्याची मुभा मिळणार आहे. क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी झेंडे यांनी ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली अन त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले होते.

दीड कोटी रुपयांची त्यांना लॉटरी लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच आनंदाच्या भरात झेंडे यांनी वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या आणि हीच चूक त्या आनंदावर विरजण टाकणारी ठरली. पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्यांची चौकशी केली आणि त्याचे निलंबन करण्यात आले. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पुढे विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःच म्हणणे मांडता येणार आहे.

ड्रीम 11 या ऑनलाईन खेळावर काही राज्यात बंदी आहे, हा खेळ जोखमीचा असल्याने तो सट्टा ठरतो. पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी यांचे आर्थिक उत्पंनाचे साधने कायदेशीर असावेत असा नियम आहे. याशिवाय कोणत्याही खेळ प्रकारात भाग घेताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. ती परवानगी झेंडे यांनी घेतली नव्हती. विशेष म्हणजे ऑन ड्युटी असे खेळ खेळणे गैर वर्तनुकीची कृती असल्याचा ठपका देखील झेंडे यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रकरण काय?
झेंडे यांना क्रिकेटची आवड आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमची आवड लागली होती. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस सागरला मिळाले आहे. या रक्कमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली होती.

करोडपती झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाची होणार चौकशी…

पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!