नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…

अहमदनगर : पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न देता दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असताना पहिल्या पत्नीने नवरदेवाला चांगलाच धडा शिकवला आहे. लग्न घटिकाजवळ येत असताना आणि वधू-वर बोहल्यावर चढत असतानाच पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री झाली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला. अखेर हे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हणत पहिल्या पत्नीने आपल्या पतीचे दुसरे लग्न रोखून नियोजित वराची वरात थेट पोलिस ठाण्यात नेली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तीस वर्षीय महिलेला माहिती मिळाली की आपला पती विशाल पवार हा अहमदनगर येथे जाऊन दुसरे लग्न करत आहे. याबाबतची माहिती समजताच पत्नीने आपला बारा वर्षांचा मुलगा आणि इतर नातेवाईकांसह नगर गाठले. नगरमध्ये आल्यानंतर संबंधित मंगल कार्यालयाचा पत्ता शोधून बरोबर लग्न लागायच्या आधी काही मिनिटे आपल्या पती समोर पोहोचली आणि लग्नात गोंधळ घातला. पहिल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या नियोजित वधूलाही मारहाण केली. विशेष म्हणजे पहिली पत्नी पोलिसांसह लग्न मंडपात दाखल झाली होती.

पोलिसांनी हस्तक्षेप करत पहिली पत्नी तिचा पती यांना पोलिस स्टेशनमध्ये आणले. पोलिस स्टेशनला आल्यानंतर विशाल पवार याच्यावर त्याच्या पहिल्या पत्नीने गुन्हा दाखल केला असून, कोणताही कायदेशीर घटस्फोट न घेता आणि एक मुलगा असताना सुद्धा आपल्या पतीने दुसऱ्या मुलीबरोबर उपनिबंधक कार्यालयात विवाह करुन एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. मात्र, त्या ठिकाणी वेळेत पोहोचल्याने तो लग्न सोहळा थांबवण्यात आला.

पतीने फसवून दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केला असल्याबद्दलचा गुन्हा अहमदनगरच्या तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये विशाल गोरखनाथ पवार याच्याविरुद्ध भादंवि कलम 494 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

प्रेम! मामीने ठोकली भाच्यासोबत धूम अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!