जालना लाठीचार्ज प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसही जखमी…
जालना : जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचे आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यामुळे एकच एक गोंधळ उडाला आहे. तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे. दगडफेकीत 37 पोलिस जखमी झाले असून, यामध्ये महिला पोलिसांचाही समावेश आहे.
अंतरवाली सराटी प्रकरणी 350 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सरकारी कामात अडथळा, दंगल भडकावणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी 1) ऋषिकेश बेद्रे रा. गेवराई जि. बीड. 2) श्रीराम कुरणकर, 3) राजु कुरनकर 4) संभाजी बेद्रे 5) महारुद्र आमुळे 6) राजेंद्र विश्वनाथ कोटंबे 7 ) भागवत तारक 8) दादा घाडगे 9) पांडुरंग तारक 10) अमोल पंडीत 11) किरण तारक 12 ) अमोल लहाणे रा. मडाकळा 13) वैभव आवटे 14) किशोर कटारे रु. साष्टपिंपळगाव 15 ) अविनाश मांगदरे 16) मयुर औटे व इतर आंदोलनकर्त्यांपैकी 300 ते 350 लोक नाव गाव माहीत नाही, यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत यांनी फिर्याद दिली. त्यांनी फिर्यादित म्हटले आहे की, ‘1 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सव्वा सातेच्या दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचाराची आवश्यकता असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी सुचवल्याने आम्ही पोलिस अधिकारी सदर ठिकाणी गेले आणि आंदोलनकर्त्यांना समजाऊन सांगितले. मात्र, त्यांनी आमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मनोज जरांगे यांना आमरण उपोषण सोडू देणार नाही, असे म्हटले. पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार आणि महसूल अधिकारी यांच्यासोबत हुज्जत घालून दंडाधिकारी आणि पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर आदेशाचे पालन न करता पोलिसांना जीवे ठार मारण्याचा कट करुन आणि तो उद्देश्य साध्य करण्यासाठी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांना गंभीर जखमी केले. तसेच पोलिस वाहनावरही दगडफेक केली आणि पोलिसांची खासगी कार जाळून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले.’ दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. एकशिंगे हे करत आहेत.
दरम्यान, जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याच्या घटनेने राज्यातले वातावरण तापले आहे. लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…
महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…
पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पोलिसकाकांनी आजीला काही मदत हवी आहे का? असे विचारले अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…