मोटारीवर पक्षाचा झेंडा अन् मोटारीच्या आतमध्ये एक महिला अन् सहा पुरूष…

लखनौ (उत्तर प्रदेश): आंबेडकरनगर जिल्ह्यात पोलिसांनी कारमध्ये आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्या सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण महामार्गावर कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले होते. महिला पोलिसांच्या मदतीने कारमध्ये पुरुषांसह असणाऱ्या एकट्या महिलेला बाहेर काढण्यात आले. चौकशीनंतर सर्वांना अटक करण्यात आली आले. कारमधील एकजण बँकेचा कर्मचारी असल्याची माहितीही समोर आली आहे.

आंबेडकर नगर हायवेवर कारमध्ये अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. पहिली घटना 21 सप्टेंबरला रात्री उशिरा बसखारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे पोलिसांनी सहा पुरुष आणि एका महिलेला कारमध्ये अश्लील कृत्य करताना रंगेहाथ पकडले. तर दुसरी घटना 24 सप्टेंबरला बेवाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी रात्री गस्त घालताना एक महिला आणि दोन पुरुषांना आक्षेपार्ह स्थितीत पकडले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे.

आंबेडकरनगच्या बसखारी पोलिस ठाण्यातील हद्दीत पोलिस रात्री गस्त घालत होते. यावेळी आजमगढ महामार्गावर एक कार उभी दिसली. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी कारजवळ जाऊन पाहिले असता त्यांना धक्का बसला. कारमध्ये सर्वजण अश्लील कृत्य करत होते, ज्यामध्ये 6 पुरुष आणि एक महिला होती. यानंतर पोलिसांनी महिला कर्मचाऱ्याच्या मदतीने महिलेला बाहेर काढले. सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. मोटारीची तपासनी केल्यानंतर पोलिसांना 10 कंडोम, 1710 रुपये, 7 मोबाईल आढळून आले आहेत. शिवाय, मोटारीवर एका पक्षाचा झेंडाही लावण्यात आला होता. पोलिसांनी ही गाडीही जप्त केली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत, 24 सप्टेंबरला बेवाना पोलिसांनी रात्री उशिरा जनपदच्या बॉर्डर बॅरियरवर एका कारला रोखले होते. यावेळी कारमध्ये एक महिला आणि दोन पुरुष आक्षेपार्ह स्थितीत आढळले. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. कारमधील तीन पॅकेट कंडोम, 2600 रुपये, 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! नवरा म्हणायचा; मला आवडत नाहीस, तुझे अनैतिक सबंध…

कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; विद्यार्थ्याला रंगेहाथ पकडले…

पोलिसांनाही धक्का! दोन युवक युवतींना सहज आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे…

धक्कादायक! आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची पोलिस अधिकाऱ्याने काढली अंतर्वस्त्रे अन्…

Video: एका बोगस आयपीएस अधिकाऱ्याची रंगली जोरदार चर्चा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!