प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा चढला पारा अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीचे लग्न झाल्यानंतर तिला भेटायला गेलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला. शिवाय, प्रेयसीने सुद्धा युवकावर गुन्हा दाखल केल्याची घटना मोहम्मदपूर गावात घडली आहे.

लग्नानंतर काही दिवसांतच नवऱ्याला बायकोच्या प्रियकराबाबत समजले होते. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाले होते. लग्नानंतरही दोघे अनेकदा भेटत होते. शिवाय, फोनवरून बोलणे सुरू असायचे. नवऱ्याने एकदा दोघांना बोलताना पकडल्यानंतर तिला थेट तिच्या माहेरी पाठवल होते. माहेरी आल्यानंतर एकदा युवती घरी एकटीच होती. तेव्हा तिचा प्रियकर तिला भेटायला आला आणि आज रात्री परत तुला भेटायला येईन, असे म्हणाला. याबाबत गावकऱ्यांना कुणकुण लागताच त्यांनी त्याला पकडले. नवऱ्यासोबतच्या वादातून युवती माहेरी राहायला आल्यावर वातावरण आधीच तापले होते. त्यात प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा पारा आणखी चढला. त्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

दरम्यान, गावकऱ्यांच्या तावडीत सापडलेल्या प्रियकराची दयनीय अवस्था युवतीने सुद्धा आपली भूमिका बदलली. तिने पोलिस स्थानकात जाऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…

हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!