बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…
कल्याण : कल्याणमध्ये असलेल्या तिसगाव परिसरात एका युवकाने बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने केलेल्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आसपासच्या नागरिकांनी त्या तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आदित्य कांबळे असे मुलीवर हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मुलीवर केलेल्या हल्ल्यानंतर फिनेल प्यायला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीवरील हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, गोल्या काही दिवसांपासून तो मुलीचा पाठलाग करत असल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी (ता. १६) संध्याकाळी सात वाजल्यापासून आरोपी आदित्य दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारात येऊन रहिवाशांना संबंधित मुलगी घरी किती वाजता येते याची माहिती घेत होता. रहिवाशांना तो कशासाठी माहिती घेतो याची जाणीव झाली नाही. आदित्य मृत मुलगी राहत असलेल्या सोसायटी परिसरात दबा धरुन बसला होता. मृत मुलगी बुधवारी रात्री आठ वाजता आपल्या आई सोबत खासगी शिकवणी वर्गावरुन घरी येत होती. सोसायटीतील जिन्यातून घरात जात असताना आदित्यने पाठीमागून येऊन मुलीच्या आईला ढकलून देऊन मुलीवर चाकूने आठ वार केले. तिच्या आईने मुलाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. बेभान झालेल्या आदित्यने आईला दाद दिली नाही. छातीवर घाव झाल्याने मुलगी जिन्यात कोसळली. आईने आरडाओरडा करताच सोसायटीतील रहिवासी, पादचारी घटनास्थळी धाऊन आले. आदित्य तेथून पळून जात होता. रहिवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
गंभीर जखमी झालेल्या मुलीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू करताच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हल्लेखोर आदित्यने दोन वेळा प्रेमासाठी गळ घातली होती. मुलीने त्यास नकार दिला होता. तो राग त्याच्या मनात होता. त्या रागातून त्याने हे कृत्य केले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
प्रेम प्रकरणातून नदीत उडी मारलेल्या युवकाचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह…
प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…
प्रेमविवाहाला परवानगी देणाऱ्या सुनेनेच काढला सासऱ्यांचा काटा…
प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…
प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…