धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…

बुलढाणा: एका व्यक्तीने महिला पोलिस कर्माचारी असलेली आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर त्यानेही आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरासह पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली आहे.

चिखली तालुक्यात राहात असलेल्या पतीने पोलिस असलेल्या पत्नीला आणि दीड वर्षाच्या चिमुकलीला चाकूने भोकसले. दोघींची हत्या केल्यानंतर त्याने एका विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. किशोर कुटे असे या माथेफिरू पतीचे नाव आहे. त्याची पत्नी वर्षा दंदाले ही चिखली पोलिसात महिला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या.

वर्षा दंदाले या आपली नाईट ड्युटी आटोपून सकाळी आपल्या पंचमुखी हनुमान परिसरातील घरी ती परतल्या होत्या. दुपारच्या सुमारास पतीने पत्नी आणि दीड वर्षाच्या चिमुकलीवर चाकूने सपासप वार करत दोघींची हत्या केली. त्यानंतर स्वतःही अंढेरा शिवारात एका विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण चिखली शहर हादरून गेले आहे. या धक्कादायक खुनी थरारातून एक आठ वर्षाची मुलगी मात्र बचावली आहे. ती शाळेत गेली असल्याने तिचा जीव वाचला आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी घटनास्थळाचा पंचनामा करून तीनही मृतदेह आपल्या ताब्यात घेतले आहे. पुढील तपासानंतरच या खुनी थरारा मागचे नेमके कारण कळू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…

पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!