ललित पाटील प्रकरण! ससूनचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक…
पुणे : ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांचे निलंबन करण्यात आले होते. ड्रग माफिया ललित पाटील याला मदत […]
अधिक वाचा...संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!
नाशिक: पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी शुक्रवारी (ता. २४) नाशिकच्या पोलिस आयुक्त पदाचा पदभार तत्कालीन आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून स्वीकारला. सर्वप्रथम त्यांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका मंदिरात जाऊन दर्शन घेत आयुक्तालयात प्रवेश केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनियुक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, ‘तत्कालीन आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिकमध्ये चांगले काम केले आहे. यापुढे वाहतुकीसह कायदा आणि सुव्यवस्थेचे […]
अधिक वाचा...आपल्या कर्तव्यामुळे नावारूपाला आलेले पोलिस अधिकारी अक्षय सोनवणे…
सातारा जिल्ह्यातील दहीवडी पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनि अक्षय सोनवणे हे संयम आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात रूजू झाले. परिस्थितीशी दोन हात केल्यानंतर यश आपोआपच मिळते. फक्त त्यासाठी लढावे लागते… अल्प परिचय… अक्षय सोनवणे यांचा पुणे जिल्ह्याच्या मातीत जन्म झाला. पुरंदर तालुक्यातील कोडीत हे सोनवणे यांचे मूळ गाव. परंतु, लहान पणापासून वारजे माळवाडी, पुणे शहर […]
अधिक वाचा...खाकी वर्दीचे आपलेपण जपणारे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके…
पोलिस खाते म्हटले की शिस्त आली; पण शिस्तीच्या खात्यातही एखादा संवेदनशील पोलिस अधिकारी असू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सातारा तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके. चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे हे महाराष्ट्र पोलिस दलाचे हे ब्रिदवाक्य असून ते सार्थ करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अहोरात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात. अशा या […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील बाबु नामदेव मिरेकर (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर ०८ साथीदारां मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८० वी कारवाई आहे. फिर्यादी यांच्या मुलास १७/०९/२०२३ रोजी मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे या ठिकाणी आरोपी सनी कांबळे, अमन शेख, आकाश कांबळे व […]
अधिक वाचा...नेपाळमधील विनाशकारी भूकंपात अनेकांचा बळी…
काठमांडूः नेपाळमध्ये शुक्रवारी (ता. ३) रात्री उशिरा 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. भूकंपात आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये हाहाकार माजवणाऱ्या भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात दिसली. बिहारमधील पाटणा […]
अधिक वाचा...ड्रग माफिया ललित पाटीलसह 12 जणांवर मोक्का; आणखी 5 किलो सोने जप्त…
पुणे (संदीप कद्रे): ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याच्या 12 साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंदकुमार लोहरे आणि ललित पाटील हे टोळी प्रमुख होते. लोहरे हा एमडी बनवणारा महाराष्ट्रातील एक्स्पर्ट होता. ड्रगमाफिया ललित पाटील याच्याकडून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ड्रग्ज विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटील याने सोनं […]
अधिक वाचा...मराठा आंदोलनानंतर गृहविभागाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश…
मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (गुरुवार) आठवा दिवस असून, त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठींबा मिळत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांकडून राजकीय नेत्यांची घरे, कार्यालय आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात उसळलेल्या हिंसाचाराची […]
अधिक वाचा...ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला 7 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. पुणे पोलिसांकडून ललित पाटील याच्या 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र ललित पाटील याच्या वकिलांनी याला आक्षेप घेतला. ललित पाटील याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचे त्याच्या वकिलांनी […]
अधिक वाचा...निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!
सहभागी होण्याचे पोलिसकाका.कॉमचे आवाहन पुणेः पोलिसदलामध्ये काम करत असताना अनेक जण जीवाची बाजी लावून धडाकेबाज कामगिरी करतात. कोणताही धागा-दोरा हाती नसताना अनेक गुन्हे उघड करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देत असतात. पोलिसकाकांनी केलेली धडाकेबाज कामगिरी वाचकांपुढे येणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. यामुळे सेवानिवृत्त झालेल्या पोलिसकाकांनी आपण उघड केलेले महत्त्वाचे दोन-तीन गुन्हे आमच्या पर्यंत पोहचविल्यास योग्य त्या […]
अधिक वाचा...
