खाकी वर्दीचे आपलेपण जपणारे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके…

पोलिस खाते म्हटले की शिस्त आली; पण शिस्तीच्या खात्यातही एखादा संवेदनशील पोलिस अधिकारी असू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सातारा तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके. चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे हे महाराष्ट्र पोलिस दलाचे हे ब्रिदवाक्य असून ते सार्थ करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अहोरात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात. अशा या पोलिस दलात एक नॉनकॉण्ट्रिव्हर्सल निःस्वार्थी प्रामाणिक पोलिस अधिकारी म्हणून उदयास आलेले विश्वजीत घोडके यांच्या प्रवासाविषयी…

अल्प परीचय…
आई ताराबाई घोडके वडील भगवानराव रामचंद्र घोडके या दाम्पत्याच्या पोटी पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी सदन कुटुंबांत विश्वजीत घोडके यांचा जन्म झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. अगदी तसच लहानपणापासून विश्वजीत घोडके यांच्यावर आई वडीलांनी चांगले संस्कार केले. कशाचीही कमतरता भासून दिली नाही. सगळे हट्ट पुरवले आई आणि वडील आपल्या आयुष्याच्या गाडीचे २ चाक असतात. आई संस्कार देते तर वडील कर्त्यव्याची जाणीव देतात, हेच संस्कार विश्वजीत घोडके यांच्यावर उमटले व आपल्या पुढील प्रवासाला त्यांनी सुरुवात केली.

शिक्षणाचा प्रवास…
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सोमेश्वर विद्यालय सोमेश्वर नगर येथे झाले. पदवीधर शिक्षण- कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे घेतले. आपण शेतकरी कुटुंबातील आहोत. लहानपणापासून शेतीची आवड असली तरी पोलिस अधिकारी होण्यासाठी घोडके यांनी प्रयत्न पणाला लावले. खास करून त्यांना आयपीएस होण्याची मोठी स्वप्ने होती. परंतु, स्पर्धा परीक्षा म्हटलं की कधी यश तर कधी अपयश हे येतेच.

पोलिस दलात रूजू…
विश्वजीत घोडके यांची सन 2009 मध्ये एमपीएससीच्या स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून पीएसआय पदी निवड झाली. याच काळात आई-वडिलांना मुलगा पोलिस अधिकारी झाल्याने प्रचंड आनंद झाला होता. पोरांने आमच्या कष्टाचे चीज केले, अशी भावना आई-वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

खाकीचा प्रवास…
पोलिस अकादमी नाशिक येथे आपले प्रशिक्षण पुर्ण करुन पहिली नियुक्ती नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर रूजू झाले. या नंतर त्यांची नियुक्ती लातूर जिल्ह्यात झाली. जिल्ह्यातील किल्लारी व मुरुड पोलिस स्टेशन येथे त्यांनी कर्तव्य बजावले. जन्म पुणे जिल्ह्यातील, शिक्षण कोल्हापूर, नियुक्ती नांदेड व लातूर या जिल्ह्यातील काळ त्यांना सुर्वण क्षण राहीला. पुढे त्यांची पदोन्नतीने सातारा जिल्ह्यात पुसेगाव पोलिस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून करण्यात आली.

सातारा जिल्ह्यात कौतुकास्पद कामगिरी…
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलिस स्टेशन येथे नियुक्ती झाल्यानंतर श्री. घोडके यांनी कृषी पदवीधर ते पोलिस अधिकारी अशी ओळख निर्माण केली. सर्वं सामान्यांचा पोलिस म्हणून खऱ्या अर्थाने नावलौकिक मिळवला. साधी राहणी उच्च विचारसरणी हे घोडके यांच्या यशाचे गमक आहे. पोलिस खाते म्हटले की गुन्हे आलेच, दडपण आले हे सर्व असतांना सुद्धा त्यांनी मोठ मोठे गुन्हे सहज सोडविले. काही गुन्ह्यात तर प्रेशर असतांनाही ते डगमगले नाही. ज्यांनी गुन्हा केला त्याला माफी मिळाली नाही. गुन्हेगाराला त्यांनी कधी माफीही दिली नाही. सहज स्वभाव असल्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत जरा हटके असल्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या हरणांना दमवण्याचे काम घोडके यांनी केले. कायद्याची बूज राखून कर्तव्याप्रती अनेक नागरीकांच्या मनात वेगळी आपुलकी जिव्हाळा निर्माण केला आहे. कोविडच्या काळात घोडके यांनी अनेक गरजूंना पदरमोड करून मदत केली आहे. कोविडच्या काळात सातारा जिल्हा पोलिस दलाने चैतन्य हॉस्पिटल निर्मिती केली होती. याच काळात घोडके यांनी आठ दिवसांत पोलिस दलाची ॲम्बुलन्स वाहन उपलब्ध करून दिली यांचे कौतुक तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले होते.

पदोन्नती…
जगामध्ये काही माणसे जन्माला येतात ती आपल्या व्यक्तीमत्त्वाने व उत्तुंग कर्तृत्वाने समाजात आपली उज्वलं परंपरा उमटवितात. सातारा तालुका पोलिस स्टेशनचा पदभार घेतल्यापासून पोलिस स्टेशनच्या हद्दीत अधिकारी व नागरिकांच्यात मनात श्री. घोडके यांनी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. पोलिस ठाण्यात नागरिकांना चांगली वागणूक मिळावी यासाठी वरीष्ठ पोलिस अधिकारी सारखे प्रयत्न करत असतात. परंतु, यामध्ये शांतताप्रिय अधिकारी म्हणून सातारा पोलिस दलातील एक नाव समोर येते ते म्हणजे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके. एखाद्या गुन्ह्याची तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्यांना पोलिस ठाण्याची पायरी चढताना भीती नाही वाटली पाहिजे. पोलिस हे आपल्या सुरक्षेसाठी असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक असला पाहिजे. नागरिकांमध्ये ही भावना निर्माण करण्यासाठी विश्वजीत घोडके यांनी कंबर कसली आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करण्यासह गुन्हेगारीला अंकुश लावणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश…
कायदा व सुव्यवस्था राबविताना घोडके यांनी अवैध धंद्यांना चाप लावला तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी आपल्या कामाची चमक दाखविली. याच काळात केवळ हाणामारी, चोरीचे गुन्हेच नव्हे तर दरोडे, लूटमारीचे गुन्हेही त्यांनी उघड केले. तालुक्यातील मटका,जुगार, गांजा या मोठ्या प्रमाणात चालणार्‍या व्यवसायांवर सतत वक्रदृष्टी ठेवली. कोणताही दबाव झुगारणारा अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द दिसत आहे. सहकार्‍यांच्या मदतीने सातारा तालुका पोलिस स्टेशन येथे आपला दबदबा निर्माण केला. श्री.घोडके यांच्यासह त्यांच्या टीमने अनेक क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करून बेधडक कारवाई केल्या आहेत.व अट्टल गुन्हेगारांना देखील अटक करण्याची कर्तबगारी केली आहे..

सुताशिवाय घोडके यांनीं गाठला स्वर्ग…
गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विश्वजीत घोडके यांचा महत्त्वाचा पुढाकार. अनेक गुन्ह्यामध्ये थंड डोक्याचे गुन्हेगार कुठलाच पुरावा मागे सोडत नाहीत.अशा गुन्ह्यांचा तपास करतांना पोलिस यंत्रणेचा खऱ्या अर्थाने कस लागतो. सुताने स्वर्ग गाठावा एव्हढाही पुरावा जेंव्हा घटनास्थळी सापडत नाही. त्यावेळी सातारा तालुका पोलिसांनी आपले कर्तव्य पणाला लावले.

ठराविक कामगिरीचा आढावा…
पीडीत अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार नक्कीच अंगावर काटा आणणारा आहे. २१ मार्च २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने साताऱ्यातील फोडजाई मंदिरा समोरील मोकळ्या जागेत तिच्या आई सोबत झोपलेल्या ४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला मोटार सायकलवरून घेऊन तिच्यावर शारीरीक अत्याचार केला व तिला सोनगाव (ता. जि. सातारा) येथील पॉलिटेक्निक कॉलेज जवळील निर्जन स्थळी सोडून आरोपी पसार झाला होता. याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अमित गणपती पाटील यांनी सातारा तालुका पोलिस स्टेशन येथे दिली. या प्रकरणी संपूर्ण जिल्हा पोलिस दल आरोपीला शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. तरी या क्लिष्ट गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करून तपासी अधिकारी यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. या संयुक्त कारवाईत पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके सहभागी होते. ज्या अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार झाले आहेत. हे कळताच त्यांचे कुटुंबिय व नातेवाईक अत्यंत संतापले होते कारण घटना पण तशीच होती. परंतु, सातारा तालुका पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी गुन्हा दाखल झाल्यापासून कुटुंबातील व्यक्तींना शांत राहण्यास मोलाची भुमिका बजावली. कारण, घोडके हे कायद्याची बुज राखत बेसिक कम्युनिटी पोलिसिंगवर भर देतात.

खुनाचा गुन्हा आणला उघडकीस…
०४/०१/२०२३ रोजी सातारा तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वाढे गावात कांताताई नलवडे यांच्या बंगल्याच्या पाठिमागे एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला होता. त्या अनुशंगाने सातारा तालुका पोलिस ठाणे गु.र.नं. ०४/२०२३ भा.द.वि.सं.कलम ३०२, २०१ गुन्हा दाखल करणेत आला होता. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अनोळखी मृतदेहाची प्रथम ओळख पटवुन तिचे नाव मंगल शिवाजी शिंदे (वय ५० वर्षे, रा. संगम माहुली ता. जि. सातारा) असे असल्याचे निष्पन्न करुन आरोपी निष्पन्न करणेत आला. सदरच्या गुन्ह्यातं सातारा तालुका पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अत्यंत क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला.

पोलिस पत्नीने केला पतीचा ‘गेम’…
२४ जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहरालगत असलेल्या वाढे फाटा येथे वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित भोसले यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्लेखोरांनी एकूण ६ गोळ्या भोसले यांच्यावर झाडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला होता. हत्येनंतर हल्लेखोर पसार झाले होते. दरम्यान, सातारा तालुका पोलिसांनी तपासासाठी विविध पथके तयार करून संशयितांचा मागोवा घेणे सुरू केले होते व गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सर्वांनी उपयुक्त भुमिका बजावली. या संयुक्त कारवाई मध्ये देखील विश्वजीत घोडके यांचा सहभाग होता.

सातारा: मटका किंग समीर कच्छीसह 46 जंणाच्या टोळीला ‘मोक्का् लावण्यासाठी पोलिस निरीक्षक श्री.विश्वजीत घोडके यांची महत्त्वाची भूमिका आहे!!

सातारा तालुका पोलिसांनी वेळोवेळी जिल्ह्यातील सर्वात मोठा मटका बुकी समीर कच्छी याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली आहे. मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या 46 साथीदारांवर संघटित गुन्हेगारी (मोका) अंतर्गत कारवाई करण्या मटका व्यवसाय, व्याजाने पैसे देऊन सावकारी करणे, टोळीची दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्यासाठी टोळीने अनेक विघातक कृत्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

पुसेगाव पोलिस स्टेशन राज्यात सर्वोत्कृष्ट…
पुसेगाव पोलिस ठाणे (जि. सातारा) हे सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून राज्यात पहिला तर देशात सातवा क्रमांक आल्याबद्दल नुकताच मा.पोलिस महासंचालक श्री. रजनीश सेठ यांच्या हस्ते पो.अधीक्षक श्री. समीर शेख व पुसेगाव पो. ठाणे टीम यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

कास रोडवर पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्टवर तालुका पोलिसांनी छापा टाकून अनेकांवर कारवाई केली होती..

सर्वं सामान्यांना हवाहवासा वाटणारा पोलिस अधिकारी…
पोलिस निरीक्षकांची केबिन सर्व सामान्य जनतेसाठी नेहमी खुली असते. अनेक प्रकरणं सामंजस्याने सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यामुळे अनेकांनी त्यांना आपलेसे केले आहे. गुन्हेगारांना शासन व सज्जनांचे रक्षण हेच पोलिसांचे काम असल्याचे घोडके यांच्या खाकी वर्दीतून दिसून येते.

मैत्रीसाठी जीव लावणारा पोलिस अधिकारी…
मैत्रीमध्ये लहान मोठा असा भेदभाव कोणीही करत नाही पण घोडके यांच्या मैत्रीतून जेष्ठांचा आदर व सन्मान करणं हे संस्कारात आहे. पोलिस अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील घोडके नेहमी मैत्रीचे नाते जपत त्यांच्या सुख-दुःखात धावून जातात.

मोर्चे, आंदोलने, उपोषण, विश्वजीत घोडके लीडरशीप अधिकारी…
त्यांनी आपल्या हद्दीमध्ये राजकीय वातावरण कधी तापू दिलं नाही. जातिय सलोखा निर्माण करीत त्यांनी कधीही जातीधर्म,लहानमोठा गरिब श्रीमंत असा कोणताही भेदभाव. केला नाहीं. भांडण तंटे,जातियतेढ गटातटाचे भांडणे उद्भवली तर ते शातिरपणाने मिटवण्याचीही त्यांच्याकडे जादुई कांडी आहे. एखादी घटना घडली तरी फार शांततेत त्याला आवर घालने असे फार कमी लोकांना जमते त्यातले म्हणजे विश्वजीत घोडके.

खाकीतल्या माणुसकीचा झरा…
जनतेच्या मनात पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असली पाहिजे. मात्र बऱ्याचवेळी अनावश्यक पोलिसिंगमुळे | जनता आणि पोलिसांमधील दरी वाढत जाते! संघर्षाच्याही घटना घडतात.घोडके साहेबांनी मात्र सुरुवातीपासूनच जनता आणि पोलिसांमध्ये दरी पडू नये, याची काळजी घेतली. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या पद्धतीने कोणावर कारवाई होणार नाही, याचीही काळजी घेताना नेहमी दिसतात.. शांततापूर्वक काम करण्याची त्यांची आगळीवेगळी पद्धत, सौजन्य पूर्वक आणि शांतता पूर्व, त्याच्याकडे आलेल्या माणसाची वेदना, व्यथा, समजून घेऊन गुन्हेगारीला काबूत ठेऊन सोबतच सामाजिक दायित्व जोपासत अडचणीत सापडलेल्या बांधवांना मदतीसाठी आधाराचा हात पुढेच होता.

– उदय आठल्ये

तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस…

वर्दीतील सुपरवुमन! डॉ. शितल खराडे-जानवे….

जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर

पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!

अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!

जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास…

कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!