
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय…
पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय घेतला असून, तृतीयपंथींना आता सिग्नलवर पैसे मागता येणार नाही. दुकानात किंवा सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा बडगा उचचला जाणार आहे, असे पुणे पोलिसांनी सांगितले. जबरदस्तीने पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
तृतीयपंथीयांसंदर्भात पुणे पोलिसांकडे नागरिकांकडून अनेक तक्रारी येत असल्यामुळे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. सिग्नलवर उभे असलेल्या वाहनांना जर त्रास दिला तर या तृतीयपंथीवर होणार कारवाई होणार आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. त्यासोबतच घरगुती समारंभमध्येदेखील आमंत्रणशिवाय हजेरी लावण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ‘पुणे शहरातील अनेक सिग्नलवर तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात. अनेकदा पैसे मागण्यासाठी तृतीयपंथी वाहन चालकांकडे जबरदस्ती करताना दिसतात. यातून वादाचे प्रकार होऊन इतर वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. पुण्यामध्ये यापुढे तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाहीत. पोलिसांनी तृतीयपंथींवर काही निर्बंध लादले असून याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार आहे.’
पुण्यात अनेक सिग्नलवर तृतीयपंथी उभे राहून पैसे मागत असतात. परिणामी सामान्य जनतेला त्रास देत असतात. त्यामुळे अनेक पुणेकर नागरिक या तृतीयपंथीयांमुळे त्रस्त असल्याचे दिसून आले. अनेक पुणेकरांनी यासंदर्भात विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई कऱण्यात आली नव्हती. अखेर अमितेश कुमार यांनी या तक्रारींची दखल घेतली आणि त्यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहे. शहराला शिस्त लागण्यासाठी आणि शहरातील नागरिकांना रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. साधारण हेच तृतीयपंथी अनेक धार्मिक कार्यक्रमांनादेखील जबरदस्तीने हजेरी लावतात आणि तिथे पैसे मागताना दिसतात. त्यामुळे धार्मिक कार्य सुरु असतानादेखील नागरिकांना तृतीयपंथीयांच्या त्रासाला सामोरं जावं लागते. त्यामुळे या कार्यक्रमावरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत, असेही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…
पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार
पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…
रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

