नेपाळमधील विनाशकारी भूकंपात अनेकांचा बळी…

काठमांडूः नेपाळमध्ये शुक्रवारी (ता. ३) रात्री उशिरा 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. भूकंपात आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नेपाळमध्ये हाहाकार माजवणाऱ्या भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात दिसली. बिहारमधील पाटणा आणि मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत भूकंपाचे हलके धक्के जाणवले आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी भूकंपामुळे झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी बचाव आणि मदतीसाठी 3 सुरक्षा एजन्सी तैनात केल्या आहेत. या भूकंपाचा प्रभाव उत्तर प्रदेशातील लखनौमध्येही दिसून आला, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरुन घराबाहेर पडले होते.

नेपाळमध्ये गेल्या महिन्यात 22 ऑक्टोबरला झालेल्या भूकंपाचे केंद्रही नेपाळमध्येच होते. नेपाळमध्ये 4 भूकंप झाले. सकाळी 7.39 वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 मोजण्यात आली. यानंतर 8 वाजून 8 मिनिटांनी 4.2 रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला. भूकंपाचा तिसरा धक्का सकाळी 8.28 वाजता जाणवला आणि त्याची तीव्रता 4.3 इतकी होती. यानंतर 8 वाजून 59 मिनिटांनी चौथ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले.

दिल्ली, एनसीआर, हरियाणातही भूकंपाचे धक्के…
दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, उत्तराखंड आणि हरियाणासह देशातील अनेक भागांत भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपामुळे अनेकजण घराबाहेर पडले. हायराईज सोसायटीच्या विधानसभा परिसरातही लोक जमले होते. रात्री 11.32 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवत होते. नागरिक जेवल्यानंतर झोपण्याच्या तयारीत असताना हे धक्के बसले. धक्क्यानंतर लोक घराबाहेर पडले. यासंदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत, ज्यामध्ये पंखे, झुंबर आणि दिवे थरथरत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 इतकी मोजली गेली. हा भूकंप जमिनीपासून 10 किमी खाली आल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!