पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….
चाकण (पुणे) : चाकण पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहायक फौजदार बाबूराव मानसिंग राठोड (वय ५०) यांचा ब्रेन हॅमरेज (मेंदूतील रक्तस्राव) झाल्याने आणि हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. राठोड यांच्या मृत्युमुळे पोलिस दलातील सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड हे सोमवारी (ता. ८) रात्री ड्युटीवर […]
अधिक वाचा...नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हातात बॅट घेतली अन्…
नाशिक (संदीप कद्रे) : नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मैदानावर हातात बॅट घेतली आणि दोन चेंडूंवर जोरदार फटकेबाजी केली. निमित्त होते पत्रकार दिनानिमित्त शहर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्याचे. पोलिस आयुक्त संघाने पत्रकार संघावर पाच गडी राखून विजय मिळविला आहे. पोलिस आणि पत्रकारांमध्ये हासत-खेळत स्पर्धा पार पडली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार […]
अधिक वाचा...पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती!
मुंबईः आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी (डीजीपी) आज (गुरुवार) नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक असणार आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात. संभाव्य पोलिस महासंचालकपदाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत रश्मी […]
अधिक वाचा...दिशा भोईटे मृत्यू आणि शवविच्छेदन अहवालाबाबत सविस्तर माहिती…
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर शवविच्छेदन अहवालाबाबत एक पोस्ट लिहिली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे… दिशा भोईटे मृत्यू आणि शवविच्छेदन अहवालाबाबत… माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट २०२३ म्हणजेच राखी पोर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी निधन झाले. निधनाला चार महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. ससून […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
मुंबई : कर्तव्यावरून आपल्या घरी जात असताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलिसकाकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सांताक्रुज पूर्व परिसरात घडली आहे. समीर सुरेश जाधव (वय 37) मृत पोलिसाचे नाव आहे. त्यांच्या मृत्युमुळे पोलिसदलात हळहळ व्यक्त केली जात आहे. समीर सुरेश जाधव हे दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. रविवारी (ता. २४) दुपारी ते साडेतीन वाजता कर्तव्यावरून आपल्या […]
अधिक वाचा...काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात गुरुवारी (ता. 21) दुपारी दहशतवाद्यांनी केलेले्या भ्याड हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले आहेत. करण सिंह यादव, गौतम कुमार, चंदन कुमार आणि रवि कुमार राणा अशी हुतात्मा झालेल्या जवानांची नावे आहेत. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लष्कराने हुतात्मा जवानांची पार्थिव शरीरं कुटुंबीयांकडे पाठवली आहेत. या घटनेनंतर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांशी संबंधित हृदयद्रावक […]
अधिक वाचा...Video: पुणे पोलिसांच्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात कार्यक्रमांची मेजवानी..
पुणे (संदीप कद्रे): पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे आयोजित केलेल्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी असून, पुणेकरांनी त्याचा लाभ घेत आहेत. पहिल्या दिवशी विविध शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. #Pune , 𝐎𝐮𝐫 ‘𝐂𝐢𝐭𝐢𝐳𝐞𝐧 𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭’ 𝐄𝐯𝐞𝐧𝐭 𝐓𝐀𝐑𝐀𝐍𝐆 𝟐𝟎𝟐𝟑 𝐡𝐚𝐬 𝐛𝐞𝐠𝐮𝐧..and WHAT A START on Day 1..! 🗓️ 22nd, 23rd & 24th […]
अधिक वाचा...नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…
नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. गेल्या काही दिवसातच गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात वचक बसला आहे. नाशिक शहरामधील गुन्हेगारी कमी होऊ लागल्यामुळे नाशिककर पोलिस आयुक्तांचे आभार मानत आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक […]
अधिक वाचा...Video: हडपसर पोलिसांनी गुन्हेगारांची काढली धिंड; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर, वैदुवाडी भागात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळक्यास हडपसर तपास पथकाकडून तात्काळ अटक करण्यात आली असून, गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या टोळक्याची हडपसर पोलिसांनी धिंड काढली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यातील हडपसर भागात १८/१२/२०२३ रोजी रात्रौ २२:१५ ते २२:३० वाजताचे सुमारास फिर्यादी तानाजी मारुती खिलारे हे त्यांच्या […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!
पुणे (संदीप कद्रे): पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून ३६० दिवसांमध्ये मोक्काचे शतक पूर्ण केले आहे. पोलिस आयुक्तांनी मोक्का अंतर्गत १००वी कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर पुणे करांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीमधील सौरभ शरद शिंदे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ४ साथीदार […]
अधिक वाचा...
