संसद भवनाच्या सभागृहात घुसखोरी; सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई…

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना सभागृहात घुसखोरी केल्यानंतर संसद भवनाच्या ८ सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन तरुणांनी संसदेच्या सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारत आत स्मोक कँडल लावल्या होत्या. तर दोघांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करत स्मोक कँडल पेटवल्या. या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला होता. आता या प्रकरणी चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी प्रकरणी संसद भवनातील आठ सुरक्षा कर्मचारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संसदेत तरुणांच्या घुसखोरीनंतर सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी लोकसभा सचिवालयाने तातडीने पावले उचलली आहेत.

संसद भवनाच्या आत आणि बाहेर कट रचणाऱ्या आरोपींची सर्वात प्रथम भेट चंदीगडमध्ये झाली होती. चंदीगड येथील भगतसिंग विमानतळाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान ही बैठक झाली होती. त्यानंतर हे आरोपी अनेकदा विशालच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी भेटले. विशाल आणि विशालची पत्नी वृंदा शर्मा यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. आरोपींना वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मागण्या, अग्निवीर आणि वन रँक वन पेन्शनचा मुद्दा उपस्थित करायचा होता. आरोपी विशालला त्याच्या राहत्या घरातूनच ताब्यात घेण्यात आले. आरोपी ललित झा याचा स्पेशल सेलच्या पथकाकडून शोध सुरू आहे.

संसदेच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली असून उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी सी आर पी एफ महासंचालक अनिश दयाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेच्या बाहेरील सुरक्षेची जबाबदारी CRPF कडे असते. CRPF चे जवान शस्त्रास्त्रांसह संसद भवन संकुलात असतात. ते संसद भवनात प्रवेश करत नाहीत. संसदेच्या सुरक्षेशी निगडीत प्रत्येक योजना इतर एजन्सींसोबत तयार करण्यात CRPF ही आघाडीची संस्था आहे.

दरम्यान, मनोरंजन डी हा मास्टरमाईंड असण्याची शक्यता आहे. त्याने इतरांना त्याच्या कार्यात सामील होण्यास प्रवृत्त केले होते. मनोरंजनला नीलमनेच भर्ती केले होते. गेल्या वर्षी भरती झाली होती. मनोरंजनची कार्यपद्धती ही नक्षलवाद्यांसारखी असल्याची माहिती समोर येत आहे. मनोरंजन त्याचा मोबाईल फोन आणि सोशल मीडिया तपशील शेअर करण्यास नकार देत आहे. संयुक्त चौकशी दिवसभर सुरू राहणार आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. ज्यामध्ये विशेष आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, 5 डीसीपी, 7 एसीपी आणि 20 हून अधिक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

संसदेत कसे घुसले? चौकशीत आलं समोर; गुन्हा दाखल…

Video: लोकसभेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे आहे कोण?

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!