प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…
हैद्राबाद: प्रियकराच्या सांगण्यावरून नर्स म्हणून काम करणाऱ्या संध्याने आपल्याच नवऱ्याला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिल्या प्रयत्नात नवरा गेला नाही मग आरोपींनी दुसरा सर्वांना चक्रावणारा क्रुर मर्डर केल्याची माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. तेलंगणामध्ये एका नर्सचे गेल्या काही वर्षांपासून एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. तिने विवाहबाह्य संबंधातून प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या केली आहे. पोलिसांनी […]
अधिक वाचा...नवविवाहित युवतीचा मृत्यूने उडाली खळबळ; मृत्यूच्या ३ तास आधी…
नवी दिल्ली : लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहित युवतीच्या मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे समोर आले आहेत. तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहितेचा मृत्यू झाल्याचे सासरच्यांचे म्हणणे आहे तर माहेरच्या नातेवाईकांचा हत्येचा आरोप आहे. नवविवाहितेच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून, याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आकृती सुतार (वय २८) शनिवारी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडली. रुग्णालयात तिचा […]
अधिक वाचा...IPS विनायक भोसले यांनी शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा केला पर्दाफाश…
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात लिसाडी गेट पोलिस आणि स्वाट टीमने संयुक्त कारवाई करत अवैध शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत ४ तयार पिस्तुले, ५ अर्धवट तयार पिस्तुले, मॅगझिन, शस्त्रनिर्मितीचे सुटे भाग आणि मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री जप्त करण्यात आली असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती IPS आणि एसपी सिटी विनायक […]
अधिक वाचा...महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक…
तिरुपती (तमिळनाडू): एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेल्या कुटुंबाची तब्बल 40 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग खोलीतच राहिली होती. मात्र, हॉटेलमधील महिला कॅशियर शशी यांनी ती बॅग सुरक्षित ठेवली आणि पोलिसांच्या मदतीने मूळ मालकाकडे सुपूर्द केली. या उल्लेखनीय प्रामाणिकपणाबद्दल तिरुपतीचे पोलीस अधीक्षक (SP) एल. सुब्बारायडू यांनी शशी यांचा शाल देऊन सन्मान केला. त्यांच्या या कृतीचं सोशल […]
अधिक वाचा...सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड; मिळालं भलं मोठं घबाड…
भुवनेश्वर (ओडिशा): एका सरकारी अभियंत्याच्या घरावर धाड टाकल्यानंतर कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 49 महागडे प्लॉट, 14 एकर परिसरात पसरलेली तीन आलिशान फार्महाऊस आणि जवळपास एक किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सहाय्यक कार्यकारी अभियंता सत्यनारायण सेठी यांना उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी […]
अधिक वाचा...लेफ्टनंट शुभम हुतात्मा अन् पत्नीने २१ लाखांचा चेक घेतला अन्…
पाटणा (बिहार): आसाममध्ये गेल्या आठवड्यात भारतीय हवाई दलाचं विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ जण हुतात्मा झाले. फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमारदेखील विमानात होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला देण्यात आलेल्या नुकसान भरपाईवरुन आता वाद निर्माण झाला आहे. सरकारकडून आणि हुलासगंज सीओंनी २१ लाख रुपयांचा धनादेश शुभम यांच्या पत्नी श्रेयाला देण्यात आला आहे. शुभम आणि श्रेया यांचे एकमेकांवर प्रेम […]
अधिक वाचा...नर्सला Kiss करताना दिसला नवरा अन् डॉक्टर महिलेने उचलले मोठे पाऊल…
चंदीगड (पंजाब): पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात सरकारी डॉक्टर मिनाक्षीने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. CCTV फुटेजमध्ये पती नर्सला Kiss करताना दिसल्यानंतर मिनाक्षीने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे, असे मिनाक्षीच्या माहेरच्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. डॉक्टर मिनाक्षी सूद हिचे पती पियुष सूद देखील डॉक्टर आहेत. पियुष जालंधरच्या नॅशनल आय हॉस्पिटलमध्ये […]
अधिक वाचा...सैराट! नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर अन् पतीचा थरारक शेवट…
लखनौ (उत्तर प्रदेश): पोलिस भरती परीक्षेसाठी नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर गेली असताना पती शिव कुमारला (वय २४) गोळी झाडून ठार मारल्याची संतापजनक घटना सहारणपूर जिल्ह्यात घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस भरती परीक्षा देण्यासाठी आकांक्षा सहारणपूरच्या गोचर इंटर कॉलेजला पोहोचली होती. तिचा पती शिव कुमारदेखील तिच्या सोबत होता. आकांक्षा परीक्षा देत […]
अधिक वाचा...IPL 2026 फायनलनंतर मोठी दुर्घटना! खेळाडूंनी भरलेल्या टीम बसला लागली मोठी आग…
अहमदाबाद (गुजरात): IPL फायनलनंतर गुजरात टायटन्सच्या टीमसोबत धक्कादायक घटना घडली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून खेळाडू हॉटेलवर जात असताना गुजरात टायटन्सच्या टीमच्या बसला आग लागली. यावेळी गुजरातचे सगळे खेळाडू बसमध्येच होते. त्यानंतर खेळाडूंना तातडीने खाली उतरवण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. गुजरात टायटन्सचे खेळाडू नरेंद्र मोदी स्टेडियमवरून आपल्या हॉटेलकडे जाण्यासाठी संघाच्या बसमधून […]
अधिक वाचा...धक्कादायक! सामूहिक हत्याकांडावेळी गोळीबार केला अन् चिरले सहा जणांचे गळे…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटकमधून राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील गोविंदपूर भागामध्ये ६ जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबार आणि गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती पुढे आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात आज (शुक्रवार) सायंकाळी ही […]
अधिक वाचा...
