
अधिकारी म्हणाला, तु मला खुप आवडतेस, माझ्या सोबत बंद केबिन मध्ये चल…
पुणेः पुणे महापालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाने सहकारी कर्मचारी महिलेशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर भारतीय न्याय संहिता ७४ नुसार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत गणपत लाड (वय ५५, रा. कर्वेनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.
संबंधित महिला कर्मचारी ३० सप्टेंबर रोजी कार्यालयात एकटी असताना चंद्रकांत लाड त्या महिला कर्मचाऱ्याकडे गेला व केबिनमध्ये येण्यास सांगू लागला. त्यावेळी संबंधित महिलेने केबिनमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर, ‘मी तुला कामात सुट देतो. पाहिजे तेव्हा सुट्टी देतो. त्यामुळे तू माझे एक काम कर, केबिनमध्ये चल म्हणाला.’ घाबरलेल्या महिलेने ही बाब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय याबाबत अधिक तपास करत आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे सिंहगड रस्ता परिसरात खळबळ उडाली असून या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित तक्रारदार महिला ही गेल्या दीड वर्षांपासून सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कायमस्वरुपी सेविका म्हणून काम करत आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याने माझ्याशी अनेकदा गैरवर्तन केलेले असून शरीर सुखाची मागणी करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच यापूर्वी सुध्दा त्याच्यावरती गैरवर्तनाच्या तक्रारी असल्याची माहिती मिळते आहे. याबाबत तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगाकडेसुद्धा तक्रार दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; सात महिन्यांची चिमुकली पोरकी…
पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…
पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…
धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…
पुणे शहरात वरिष्ठ व्यवस्थापक महिलेला म्हणाला, फक्त एक ‘किस’ दे अन् पुढे…

