
पती भजनाच्या कार्यक्रमात व्यस्त अन् पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत…
वर्धा : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकर व त्याच्या तीन सहकाऱ्यांच्या साथीने गळा आवळून हत्या केल्याची घटना शेकापूर बाई (ता. हिंगणघाट) येथे घडली आहे. संतोष पांडुरंग कैकाडे (वय ४२) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पत्नीचे शुभम कैकाडे याच्याशी प्रेम संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पती संतोष पांडुरंग कैकाडे हा अडथळा ठरत होता. पत्नी सपना हिने शुभम कैकाडे आणि त्याच्या साथीदारासोबत मिळून संतोष याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर घटना कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून गावाजवळील शेतात मृतदेह फेकून देण्यात आला. वडनेर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी सपना कैकाडे, शुभम कैकाडे, सचिन बसूने, प्रशांत करपे या चौघांना अटक केली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
मृत संतोष कैकाडे यांची पत्नीचे शुभम कैकाडे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. १६ ऑगस्टच्या रात्री संतोष कैकाडे हे भजनाचा कार्यक्रम संपवून घरी परत आले. त्यावेळी पत्नी आणि शुभम हे दोघेही घरी नको त्या अवस्थेत आढळून आले. हे प्रकरण उघडकीस आल्याने आणि अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने, पत्नी आणि शुभम यांनी मिळून संतोष यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आपल्या दोन मित्रांच्या मदतीने संतोष यांचा मृतदेह गावाजवळील शेतात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून संतोष कैकाडे हे गावात कुठेच दिसत नसल्यामुळे गावकऱ्यांना संशय आला होता. दरम्यान, मंगळवारी खुद्द पत्नीनेच संतोष यांचा मृतदेह गावाबाहेरील शेतात असल्याचे गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नवविवाहितेला नको त्या अवस्थेत, नको त्या व्यक्तीसोबत पाहिले अन्…
पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन् तिचे दोन प्रियकर आले…
नवविवाहित सुनेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् काही वेळातचं संपवलं…
महिलेचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध अन् दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं…
नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या अन् गेली; हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत सापडली…

