
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड; मिळालं भलं मोठं घबाड…
भुवनेश्वर (ओडिशा): एका सरकारी अभियंत्याच्या घरावर धाड टाकल्यानंतर कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 49 महागडे प्लॉट, 14 एकर परिसरात पसरलेली तीन आलिशान फार्महाऊस आणि जवळपास एक किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सहाय्यक कार्यकारी अभियंता सत्यनारायण सेठी यांना उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तपासादरम्यान सेठी यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्न स्रोतांपेक्षा कितीतरी अधिक मालमत्ता आढळून आली. यामध्ये दोन फ्लॅट्सचाही समावेश आहे. त्यापैकी एक फ्लॅट कथितपणे बेनामी असल्याचे तपासात समोर आले आहे.
View this post on Instagram
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश…
14 एकर क्षेत्रात पसरलेली 3 फार्महाऊस
49 प्लॉट
940 ग्रॅम सोन्याचे दागिने
2.5 किलो चांदी
5.48 लाख रुपये रोख रक्कम
60.92 लाख रुपयांहून अधिक बँक ठेवी
एक चारचाकी वाहन (कथित बेनामी)
दरम्यान, या छाप्यासाठी ओडिशा विजिलन्स विभागाने सात विशेष पथके तयार केली होती. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व सात डीएसपी करत होते. पथकांमध्ये 9 निरीक्षक, 11 एएसआय आणि इतर कर्मचारी सहभागी होते. सत्यनारायण सेठी यांनी 1998 मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सरकारी सेवेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांचा मासिक पगार केवळ 7,100 रुपये होता. यानंतर 17 वर्षांच्या सेवेनंतर 2015 मध्ये त्यांची सहाय्यक अभियंता (Assistant Engineer – AE) पदावर पदोन्नती झाली आणि त्यांची कोटपाडा ब्लॉकमध्ये नियुक्ती करण्यात आली.
जून 2020 मध्ये त्यांची बदली बोरिगुमा ब्लॉकमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर 2025 मध्ये त्यांना सहाय्यक कार्यकारी अभियंता (AEE) या वरिष्ठ पदावर बढती मिळाली. बढतीनंतर त्यांची पुन्हा कोटपाडा ब्लॉकमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता विजिलन्स विभागाच्या कारवाईनंतर त्यांच्याकडे असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
अभियंत्याच्या घरावर धाड टाकताच मिळालं मोठं घबाड…
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…
पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन् मिळालं मोठं घबाड…
मोठं घबाड! जंगलात कारचा दरवाजा उघडला अन् सोनं, पैसे पाहून पोलिसही चक्रावले…

