सांगलीमध्ये सराईत गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून; हल्लेखोर…
सांगली: सांगलीमधील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझनचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. सचिन ऊर्फ सच्या टारझन याला गंभीर जखमी अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. गुंड सच्या टारझन हा अनैतिक संबंध असलेल्या अहिल्यानागरमधील महिलेच्या घरी रात्री […]
अधिक वाचा...पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…
नवी दिल्ली: पाकिस्तानातून पळून नेपाळ मार्गे बेकायदेशीर रित्या भारतात दाखल झालेली सीमा हैदर हिने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करताना थेट त्यांनाच प्रश्न विचारला आहे. या याचिकेत तिला भारताचे नागरिकत्व देण्यात यावे याविषयी सीमा बोलली आहे. अक्षय कुमार आणि आलिया भट्ट या देशात कसे राहू शकतात तर मी का नाही? असा प्रश्न तिने विचारला आहे. सीमा […]
अधिक वाचा...Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पुणे तिथे काय उणे – संतोष धायबर, संदीप कद्रे पुणे शहरातील बंगळूर महामार्गावर वारजे माळवाडी, कोथरूड आणि सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी हॉटेल आणि बार-रेस्टॉरंट आहेत. ठरवून दिलेल्या वेळेनंतरही रात्रीच्या सुमारास पाठामागच्या दाराने सर्वकाही सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नशेच्या आहारी गेल्यामुळे दुचाकी चालवता न येणाऱ्या युवकांपासून ते पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचा […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…
पुणे: अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त भारत गायकवाड, पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. भारत […]
अधिक वाचा...इर्शाळवाडीमधील बेपत्ता नागरिकांबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय…
रायगड : इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू असलेली शोधमोहिम तिसऱ्या दिवशी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली. उदय सामंत यांनी सांगितले की, ‘इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. २९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर […]
अधिक वाचा...बारमध्ये महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्याने पेटवला बार; ११ जणांचा मृत्यू…
मेक्सिको: एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीला बारमधून बाहेर काढण्यात आले होते. बारमधून बाहेर काढल्याच्या रागातून त्याने बारच पेटवून दिला. या घटनेत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. अमेरिकेच्या सीमेला लागून असलेल्या मेक्सिकोच्या उत्तरेकडील सोनोरा राज्याच्या सॅन लुइस रिओ कोलोरॅडो शहरात शनिवारी मध्यरात्री जाळपोळ झाल्याची घटना […]
अधिक वाचा...मालेगावमध्ये गुप्तधनासाठी मुलाचा नरबळी, गळा चिरलेला अन्…
मालेगाव : गुप्तधनासाठी नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाचा नरबळी दिल्याच्या आरोपावरून बापलेक, मेहुणा आणि भोंदुबाबा यांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. कृष्णा सोनवणे हा रविवारी (ता. १६) शेतात जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. पण, सायंकाळी […]
अधिक वाचा...सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…
नवी दिल्लीः पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर सध्या जोरदार चर्चेत आहे. क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर मला आवडतो म्हणून मी सचिनवर प्रेम करते, असे काही लोक म्हणत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की, माझा आवडता प्लेयर सचिन तेंडुलकर नाही, तर विराट कोहली आहे, असे सीमा हैदर हिने म्हटले आहे. सीमा हैदर हिला गुप्तहेर, […]
अधिक वाचा...मणिपूर विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार पीडिता कारगील हीरोची पत्नी…
इंफाळ: मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यामधील एक पीडिता कारगील युद्धातील हीरोची पत्नी असल्याचे समोर आले आहे. युद्धात देशासाठी लढलो, पण माझ्या पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही. कारगिलच्या युद्धापेक्षाही हे युद्ध मला भयंकर वाटतेय, अशा शब्दांत पीडितेचा पती आणि कारगिल युद्धातील हीरोने आपली वेदना मांडली. माझे सर्वस्व उद्ध्वस्त […]
अधिक वाचा...सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिण राहिली गरोदर…
छत्रपती संभाजीनगर: सख्ख्या भावानेच आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केला असून, अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पीडितेच्या सख्ख्या भावासह मावस भावावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित मावस भावावर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी […]
अधिक वाचा...
