छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन; निट रहा नाहीतर…

नाशिक : राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या बाबत अंबादास खैरे यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ‘राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर व्हॉटसअपद्वारे धमकी दिली आहे. तुम्ही निट रहा नाहीतर तुम्हाला बघुन घेऊ, अशी धमकी दिली आहे.’ या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकीच्या फोनचे कार्ड लोकेशन परभनीकडील दाखवत आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.

दरम्यान, मराठा जातीचा समावेश ओबीसीमध्ये करण्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात तू तू मै मै सुरु आहे. आज (शनिवार) होणाऱ्या सभेच्या खर्चावर मंत्री भुजबळ यांनी बोट ठेवले आहे. यावरून पुन्हा वादावादी सुरु झाला आहे. यावर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मी एकटा मराठा आरक्षण अडवू शकतो का ? असा सवाल केला आहे.

छगन भुजबळ यांना काल (शुक्रवार) फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दुपारपासून भुजबळ यांना अज्ञात लोकांकडून धमकीचे फोन येत आहेत. मराठा आरक्षणाला विरोध कराल तर परिणाम भोगावे लागतील. तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशा धमकीचे भुजबळांना फोन आले आहेत.

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारा म्हणाला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याबरोबरच बॉम्ब स्फोटची धमकी…

इंदुरीकर महाराज यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश…

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली…

ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!