सांगलीमध्ये सराईत गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून; हल्लेखोर…

सांगली: सांगलीमधील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझनचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे.

सचिन ऊर्फ सच्या टारझन याला गंभीर जखमी अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. गुंड सच्या टारझन हा अनैतिक संबंध असलेल्या अहिल्यानागरमधील महिलेच्या घरी रात्री गेला होता. सकाळी त्याच्या मुलाने पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यानंतर हा युवक थेट पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, सचिन ऊर्फ सच्या टारझन याच्यावर दाद्या सावंत खूनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. सांगलीतील सराईत गुंड अशी त्याची ओळख होती. सच्या टारझनचा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!