सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिण राहिली गरोदर…
छत्रपती संभाजीनगर: सख्ख्या भावानेच आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केला असून, अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पीडितेच्या सख्ख्या भावासह मावस भावावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित मावस भावावर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी मेहरे यांनी त्याला जमीन मंजूर केला आहे.
गंगापुर तालुक्यातील पीडित मुलीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मावस भावाने ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे म्हटले होते. मात्र नंतर पीडितेने 24 मार्च 2023 रोजी पुरवणी जबाबात सख्ख्या भावाने शारीरिक संबंध ठेवल्याचे म्हटले. नाताळच्या सुट्ट्यात 10 दिवस तिचा भाऊ घरी होता. त्यादरम्यान वेळोवेळी त्याने शारीरिक संबंध ठेवले असल्याचे पीडितेनं सांगितले.
पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर डीएनए चाचणी करण्यात आली. यामध्ये सख्ख्या भावाकडूनच बहीण गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पीडितेच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.