बारमध्ये महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्याने पेटवला बार; ११ जणांचा मृत्यू…

मेक्सिको: एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीला बारमधून बाहेर काढण्यात आले होते. बारमधून बाहेर काढल्याच्या रागातून त्याने बारच पेटवून दिला. या घटनेत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

अमेरिकेच्या सीमेला लागून असलेल्या मेक्सिकोच्या उत्तरेकडील सोनोरा राज्याच्या सॅन लुइस रिओ कोलोरॅडो शहरात शनिवारी मध्यरात्री जाळपोळ झाल्याची घटना घडली. बारला लावलेल्या आगीमध्ये सात पुरुष आणि चार महिलांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपीला महिलांसोबत चुकीचं वर्तन केल्याबद्दल बारमधून बाहेर काढण्यात आले होते. पण तो परत आला आणि बारला आग लावली. शहराचे महापौर सँटोस गोन्झालेझ यांनी सांगितले की, संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. सोनोरा राज्य सरकारी वकिलांनी सांगितले, की प्राथमिक तपासात असं दिसून आले आहे की शनिवारी पहाटे झालेल्या हल्ल्याच्या वेळी संशयित पुरुष खूप मद्यधुंद होता आणि तेथील महिलांशी असभ्य वागल्याबद्दल त्याला बारमधून बाहेर काढण्यात आले होते. यानंतर त्याने बारला आग लावली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!