पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…

पुणे: अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त भारत गायकवाड, पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी मृतांची नावे आहेत.

भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुणे शहरात वास्तव्याला होते. सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भरत यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पत्नी आणि पुतण्याचा खून केल्यानंतर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. खून आणि आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाटवले आहेत. खून आणि आत्महत्येमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!