पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी अवजड वाहनांवर बंदी; कधीपर्यंत पाहा…
पुणेः पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी ३० प्रमुख चौकांमध्ये १२ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांवर बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक समस्या काही प्रमाणात सोडविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहरच वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी एक अधिसूचना जाहीर करून शहरातील ३० प्रमुख ठिकाणी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत अवजड वाहनांवर बंदी लागू केली आहे. पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यांचा अपुरी दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक समस्येत वाढ झालेली आहे.
अवजड वाहनांसाठी बंदीचा नियम असला तरी आपत्कालीन सेवांमध्ये सहभागी वाहनांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. ट्रक, डंपर, मिक्सर आणि इतर अवजड वाहनांवर लागू होईल. पुण्यातील ३० प्रमुख वाहतूक चौक आणि ठिकाणी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत या वाहनांवर बंदी लागू राहील.
अवजड वाहनांसाठी बंदी असलेले चौक पुढीलप्रमाणे….
संचेती चौक, पौड फाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल, निलायम पूल, सावरकर पुतळा चौक, लक्ष्मी नारायण सिनेमा चौक, सेव्हन लव्ह्स चौक, पंडोल अपार्टमेंट चौक, खणे मारुती चौक, पावर हाऊस चौक, आरटीओ चौक, पाटील इस्टेट चौक, ब्रेमन चौक, शास्त्री नगर, आंबेडकर चौक, चंद्रमा चौक, मुंढवा चौक, नोबेल चौक, लुल्लानगर ते गोळीबार मैदान, लुल्ला नगर ते गंगाधाम, पुष्पा मंगल चौक, राजास सोसायटी, पोल्ट्री चौक, उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, अभिमनाश्रे बाणेर आणि अभिमनाश्री पाषाण.
जड वाहतूक बंद असलेले चौक दि. 12.08.2024पर्यंत pic.twitter.com/tky2SqvoUC
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) August 4, 2024
पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…
पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न…
पुणे शहरात वाहतूकीत प्रायोगिक तत्वावर बदल; जाणून घ्या,पर्यायी मार्ग कोणते…
पुणे शहराला पावसाने झोडपले; डेक्कन भागात पावसाचे तीन बळी…
पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…