पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

नवी दिल्ली: पाकिस्तानातून पळून नेपाळ मार्गे बेकायदेशीर रित्या भारतात दाखल झालेली सीमा हैदर हिने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करताना थेट त्यांनाच प्रश्न विचारला आहे. या याचिकेत तिला भारताचे नागरिकत्व देण्यात यावे याविषयी सीमा बोलली आहे. अक्षय कुमार आणि आलिया भट्ट या देशात कसे राहू शकतात तर मी का नाही? असा प्रश्न तिने विचारला आहे.

सीमा हैदर हिने दया याचिकेत म्हटले आहे की ‘मी सचिनसोबत लग्न केले असून माझे त्याच्यावर खरं प्रेम आहे, त्यामुळे मला मी भारताची सून आहे. मी हिंदू धर्म स्वीकारला आहे. या कारणामुळे मला भारताचे नागरिकत्व देण्यात यावे. प्रेमासाठी मी सीमा पार करून आले आहे आणि त्याच्यासोबतच मला आयुष्य काढायचे आहे. अक्षय कुमार आणि आलिया भट्ट यांचा उल्लेख केला आहे. ते या देशात कसे राहू शकतात तर मी का नाही? असे सीमा आणि तिचे वकील म्हणाले आहेत.’

याचिकेमध्ये सीमा हैदर हिने हीर रांझा, लैला मजनू यांचा उल्लेख केला आहे. सीमाचा दावा आहे की, तिने हिंदू धर्म स्वीकारला आणि नेपाळमधील काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात हिंदू विधीनुसार सचिनसोबत लग्न केले आहे. तिची चार मुलं आणि पती सचिन मीना यांच्यासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. अक्षय कुमार आणि आलिया भट्ट यांचा उल्लेख केला आहे. ते या देशात कसे राहू शकतात तर मी का नाही? असं सीमा आणि तिचे वकील म्हणाले आहेत.

दरम्यान, सीमा आणि सचिन या दोघांमध्ये आठ वर्षांचा फरक आहे. सीमा आता 30 वर्षांची आहे. तर सचिन हा 22 वर्षांचा आहे. सीमा आणि सचिनची ओळख ही ऑनलाइन गेम पबजी खेळताना झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सीमा तिच्या चार मुलांसोबत भारतात आली आहे. सीमाला काही दिवसांपूर्वी ATS घेऊन गेले होते आणि तिची चौकशी सुरु होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!