मालेगावमध्ये गुप्तधनासाठी मुलाचा नरबळी, गळा चिरलेला अन्…

मालेगाव : गुप्तधनासाठी नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाचा नरबळी दिल्याच्या आरोपावरून बापलेक, मेहुणा आणि भोंदुबाबा यांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

कृष्णा सोनवणे हा रविवारी (ता. १६) शेतात जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. पण, सायंकाळी तो घरी परतला नाही. शोध घेऊनही तो न सापडल्याने वडिलांनी पोलिसात धाव घेत मुलगा पळवून नेल्याची किंवा त्याचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी कृष्णाचा शोध सुरू केला. दरम्यान, वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील विहिरीजवळ जमिनीत पुरलेल्या अवस्थेत कृष्णाचा मृतदेह आढळला. त्याचा गळा कापण्यात आला होता. वन विभागाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. गळा चिरलेल्या आणि मातीच्या ढिगाऱ्यात पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर नरबळीची शंका व्यक्त केली जात होती.

कृष्णाचा मृतदेह आढळल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या गळ्यावर कापल्याच्या खुणा असल्याने नरबळीचा संशय व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून, नरबळी प्रकरणी भोंदुबाबासह चौघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!