पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
पुणे : ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना वानवडी भागातील बी. टी. कवडे रोडवर घडली आहे. सराफा व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून, गोळीबार करणाऱ्यांनी व्यावसायिकाकडील सोनं लुटून नेले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रतिक मदनलाल ओसवाल (वय 35) असे गोळीबारात गंभीर झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडिलांसोबत दुचाकीवरील जाणाऱ्या सराफ व्यावसायिकावर […]
अधिक वाचा...मुंबई-पुणे मार्गावरील पुलावरून मोटार पडली रेल्वेवर; तिघांचा मृत्यू…
मुंबई : मुंबई-पुणे चौपदरी मार्गावरून जाणारी एक मोटार पुलावरुन खाली पडली आणि पुलाखालून जाणाऱ्या मालगाडीवर आदळली. यावेळी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान गाडी मुंबई-पनवेल चौपदरी मार्गावरून नेरळकडे जात असताना ही घटना घडली. धर्मानंद गायकवाड (वय 41) आणि त्यांचे चुलत भाऊ मंगेश जाधव (वय […]
अधिक वाचा...संगमनेर कारागृहातून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी गज कापून पळाले…
संगमनेर (अहमदनगर): संगमनेर कारागृहातून चार कैदी पळून गेल्याची घटना आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास घडली आहे. पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. संगमनेर तहसील कार्यालय परिसरात संगमनेर शहर पोलिस ठाणे तसेच इतरही अनेक शासकीय कार्यालये आहेत. शहर पोलिस ठाण्याला लागूनच कारागृह आहे. या कारागृहाचे गज कापून चार कैदी पळून गेले. पळून गेलेल्या चौघांचा पोलिसांनी शोध […]
अधिक वाचा...बलात्कार प्रकरणातील हवालदाराचा प्रताप उघड; मनसेकडून तोडफोड…
पुणे : रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी एका महिलेसह दोघांना अटक केली. हवालदाराने रेल्वेच्या जागेत बेकायदा सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्था सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. रेल्वेच्या जागेतील संस्थेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेतील कार्यालयाची मंगळवारी (ता. ७) दुपारी तोडफोड केली. हवालदाराने या […]
अधिक वाचा...स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीची संशयावरून हत्या…
सातारा : नवऱ्याने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या पत्नीची चारित्र्याच्या संशयावरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना म्हसवड येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दिपाली धोंडीराम पुकळे (वय 29) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. धोंडीराम पुकळे (वय 40, रा. पुकळेवाडी, ता. माण) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील बाबु नामदेव मिरेकर (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर ०८ साथीदारां मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८० वी कारवाई आहे. फिर्यादी यांच्या मुलास १७/०९/२०२३ रोजी मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे या ठिकाणी आरोपी सनी कांबळे, अमन शेख, आकाश कांबळे व […]
अधिक वाचा...नांदेड हादरले! टोळक्याकडून युवकाची तलवारीने सपासप वार करत हत्या…
नांदेड: एक टोळके पोत्यात तलवारी भरुन घेऊन आले आणि त्यांनी तिघांवर सपासप वार केले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नांदेड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात सोमवारी (ता. ६) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. […]
अधिक वाचा...मुंबईत पॉर्न फिल्मचे शूटिंग सुरु असताना पोलिसांनी टाकली धाड…
मुंबई: एका अॅडल्ट फिल्मचे शूटिंग करताना आणि त्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग करताना पोलिसांनी धाड टाकली आणि तीन अभिनेत्यांना अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन महिला (20 आणि 34 वर्षे) आणि एका युवकाचा (वय 27) समावेश आहे. संबंधित अॅपवर या चित्रपटाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते. हे यूके स्थित ओन्लीफॅन्स प्लॅटफॉर्मसारखे आहे, जिथे मुले […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरणाच्या वादातून युवकावर केले सपासप चाकूने वार…
छत्रपती संभाजीनगर : प्रेम प्रकरणातून एका युवकाचा सपासप चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. गणेश राऊत असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदत्त नगर परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये प्रेम प्रकरणातून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी (ता. ६) रात्री गुरुदत्तनगरमध्ये समोरासमोर राहणाऱ्या या […]
अधिक वाचा...गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…
बुलढाणा : शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला असून, संताप व्यक्त होत आहे. सतीश विक्रम मोरे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीने बुलढाणा शहर […]
अधिक वाचा...
