हृदयद्रावक! आई रक्ताच्या थारोळ्यात अन् चिमुकला मृतदेहाला बिलगलेला…

यवतमाळः एकाने दारुच्या नशेत पत्नीची निर्घृण हत्या केली. आई रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेली असतानाही चिमुकला तिला बिलगून राहिल्याची हृदयद्रावक घटना तेंभुरदरा येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पतीने दारुच्या नशेत पत्नीची हत्या केल्यानंतरचा संबंधित व्हिडीओ नातेवाईकांना पाठवला. हा सगळा प्रकार बघून नातेवाईक हादरले, त्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिस जेव्हा घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा घटनास्थळावरील चित्र बघून पोलिसही हळहळले. मृतदेहाशेजारी महिलेचा चिमुकला बिलगून राहिला होता. मृत आईच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न करत होता. संबंधित दृश्य बघून अनेकांचं काळीज पिळवटून निघाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

बालाजी जंगले असे आरोपीचे नाव तर मीराबाई जंगले हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. बालाजी जंगले आणि मीराबाई जंगले या जोडप्याचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत. यवतमाळ येथून कर्नाटकच्या बेळगावजवळील उप्परट्टी गावात ऊसतोडणीसाठी गेले होते. दरम्यान या जोडप्यामध्ये क्षुल्लक कारणातून वाद झाला. यावेळी दारुच्या नशेत असणाऱ्या आरोपी पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने क्रूर कृत्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि तो पत्नीच्या कुटुंबीयांना पाठवला. या घटनेचे वृत्त समजताच गोकाकचे डीएसपी, सीपीआय, पी, एस, आय. यांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीने महिलेची हत्या केल्यानंतर रात्रभर मृतदेह घटनास्थळी पडून होता. सकाळी जेव्हा पोलिस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा महिलेचा लहान मुलगा मृत झालेल्या आईच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आई निपचित पडून होती. आईसोबत काय घडलंय, याची काहीच कल्पना त्याला नव्हती. हे दृश्य बघून अनेकांचे हृदय पिळवटून निघाले. पोलिसांनी आरोपीची रवानगी गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्यात केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.

शिरीष महाराज मोरे यांच्या चार हृदयद्रावक सुसाईड नोट आल्या समोर…

हृदयद्रावक! पती-पत्नीचे भांडण अन् जीव गेला दोन चिमुकल्यांचा…

हृदयद्रावक! शेकोटीत पडलेल्या 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू…

हृदयद्रावक! बिबट्याच्या हल्ल्यात वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू…

हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!