गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…
बुलढाणा : शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला असून, संताप व्यक्त होत आहे. सतीश विक्रम मोरे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीने बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक सतीश मोरे याच्याविरोधात पोक्सोसह इतर कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपी शिक्षक हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. त्याने आठवीत शिकणाऱ्या एका मुलीला तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…
मदरशातल्या 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने केला अनैसर्गिक बलात्कार…
शिक्षकाने स्वतःच्या जागी ठेवला रोजंदारीवर निवृत्त शिक्षक; वर्गातच जुगार…
विद्यार्थिनीला मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल…
शिक्षकाने बॅड टच करत तुला पीटी क्लास कसा वाटला? असे विचारले अन्…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!