
धक्कादायक! दांपत्याने घेतला सेल्फी अन् डोळ्यादेखत पत्नीने मारली पुलावरून उडी…
नागपूर: एका दाम्पत्याने कन्हान नदीवरील नेरी पुलावरुन जात असताना निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबवली आणि क्षणात महिलेने (वय २३) अचानक पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय 23) असे महिलेचे नाव आहे. त्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरे यांच्या सोबत राहत होत्या. काही कळायच्या आत ही घटना घडली आहे. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास साकोरे दाम्पत्य कारमधून काचूरवाही गावाकडे जात होते. या दरम्यान कार कन्हान नदीच्या नेरी पुलावर आली असता निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबली आणि त्यानंतर दोघांनी सोबत काही वेळ त्या पुलावर घालवला. या दरम्यान दोघांनी मोबाईलवर सेल्फी देखील घेतला. मात्र, काही क्षणात ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून नदीत उडी मारली. हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना आश्चर्याचा जबर धक्का बसला. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र जवळपास कुणीही नसल्याने कुठलीही मदत मिळू शकली नाही. नंतर उशिरा घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने तात्काळ शोधमोहीम राबवली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र या धक्कादायक घटनेमागे कौटुंबिक वाद असावा, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. पोलिसांनी विजय साकोरे याचाही जबाब नोंदवला असून, पुढील तपास कामठी पोलिस करत आहेत.
बीड! शिक्षकाची आणखी एक विकृती समोर; गुन्हा दाखल…
पुणे! म्हातारा रिसेप्शनिस्ट युवतीला म्हणाला; मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो…
पुणे जिल्ह्यात वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोघे ताब्यात…
प्रेम प्रकरण! फोन सायलेंट मोडवर अन् प्रेयसीचा झाला मोठा गैरसमज…
डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…

