प्रेम प्रकरणाच्या वादातून युवकावर केले सपासप चाकूने वार…

छत्रपती संभाजीनगर : प्रेम प्रकरणातून एका युवकाचा सपासप चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. गणेश राऊत असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदत्त नगर परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये प्रेम प्रकरणातून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी (ता. ६) रात्री गुरुदत्तनगरमध्ये समोरासमोर राहणाऱ्या या दोन कुटुंबामध्ये पुन्हा भांडण सुरू झाले. यावेळी दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांच्या दोन्ही बाजूच्या युवकांनी हस्तक्षेप केला. कुटुंबाच्या भांडणातून या दोन्ही बाजूच्या युवकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. यावेळी एका युवकाने स्वतःजवळ असलेला चाकू काढून दुसऱ्या तरुणावर चाकूने वार केले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी फरार झाला होता. पण, पोलिसांनी अखेरीस मुख्य आरोपी सागर विक्रम केजभटला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…

वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…

धक्कादायक! प्रेमसंबंधातून नवऱ्यासह तीन मुलांची हत्या…

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!