स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीची संशयावरून हत्या…

सातारा : नवऱ्याने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या पत्नीची चारित्र्याच्या संशयावरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना म्हसवड येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दिपाली धोंडीराम पुकळे (वय 29) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. धोंडीराम पुकळे (वय 40, रा. पुकळेवाडी, ता. माण) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दिपाली आणि धोंडीराम यांना 9 आणि 8 वर्षांची दोन मुले आहेत. धोंडीराम आणि पत्नी दीपाली हे म्हसवड येथील सहकारनगर परिसरात कवी वस्तीनजीक एका बिल्डिंगमध्ये भाडोत्री म्हणून राहत होते. दिपाली ही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. धोंडीराम हा शनिवारी रात्री दारू पिऊन आला. यानंतर यावेळी पती पत्नीमध्ये भांडण झाले. या भांडणात त्याने पत्नी दिपालीचे डोके भिंतीवर आपटले. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

भाजप नेत्याची घरात घुसून हत्या; पत्नीने केला संशय व्यक्त…

पत्नीसाठी केले धर्मांतर अन् विवाहानंतर तिचीच केली हत्या…

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

धक्कादायक! संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीची केली हत्या अन् पुढे…

जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!