महाराष्ट्र हादरला! माजी सरपंचाची टोळक्याकडून क्रूरपणे हत्या…
छत्रपती संभाजीनगर: ओव्हरगावमध्ये जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण यांची क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत असताना टोळीने लाठ्याकाठ्या, लाथांनी पठाण यांच्यासह त्यांच्या […]
अधिक वाचा...लातूर! धाब्यावर चिकन अन् दारू पाजली अन् जाळून मारलं पण कानून के हात लंबे होते है…
लातूर : एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावत सत्य उलगडले आहे. ‘कानून के हात लंबे होते है’ हा डॉयलॉग चित्रपटात ऐकला असेल. पण, याचा प्रत्यय लातूरमध्ये […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! कलाकेंद्रात कामाचं अन् पैशांचं आमिष दाखवलं, सामूहिक अत्याचार…
बीड: नृत्याची आवड असलेल्या मुलीला कलाकेंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका महिलेसह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित गुन्हा आंबेजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. या […]
अधिक वाचा...धक्कादायक! लातूरमध्ये इन्शुरन्साठी दाखवला स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्यालाच जाळलं जिवंत…
लातूर : एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावत सत्य उलगडले आहे. डोक्यावरील कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. विशेष म्हणजे, या बनावासाठी लिफ्ट […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये आज (सोमवार) सकाळी काही शालेय विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर झाल्याची घटना घडली आहे. एका खासगी ट्यूशनमध्ये मुलाची (वय १६) गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एका खासगी ट्यूशनमध्ये विद्यार्थ्याची हत्या झाल्याने राजगुरूनगर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. […]
अधिक वाचा...लातूर! कारमध्ये हातपाय बांधून टाकलेल्या युवकाचा झाला अक्षरशः कोळसा…
लातूर: औसा-सोलापूर महामार्गापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या वानवडा रस्त्यावर शनिवारी रात्री उभी असलेली एका कारमध्ये हातपाय बांधून टाकलेल्या एका युवकाचा अक्षरशः कोळसा झाला. अनैतिक संबंधांच्या संशयावरून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एक स्कोडा कार वानवडा रस्त्यावर शनिवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास पेटताना स्थानिकांनी […]
अधिक वाचा...पुणे शहरात नवीन पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी; पाहा रचना…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वित्त आणि गृह विभागाला पाच नवीन पोलिस ठाणी, अतिरिक्त मनुष्यबळ, दोन नवीन परिमंडळाच्या निर्मितीस मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देताना वित्त विभागाने निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. पुणे पोलिस दलात आता सात परिमंडळे (झोन) […]
अधिक वाचा...नवरा परदेशात नोकरीला असताना घरात CCTV लावून ठेवायचा नजर अन्..
मुंबई: एका विवाहित महिलेने सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह सासरच्या एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शाहिस्ता मोहम्मद अमीन खान (वय २६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सासरे मोहम्मद […]
अधिक वाचा...पुणे! गुंड गजा मारणे प्रकरणी पाच पोलिसांवर मोठी कारवाई…
पुणे: कुख्यात गुंड गजा मारणे याला अटक करून सांगली कारागृहात नेत असताना ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ देणं पुणे पोलिस दलातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या महागात पडले आहे. हलगर्जीपणामुळे एका सहायक पोलिस फौजदारासह चार पोलिस कर्मचाऱ्यांवर दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणे याला काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याला सांगली […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू…
सातारा: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात गुरुवारी (ता. ११) दुपारी एक थरकाप उडवणारा अपघात झाला. खासगी शिकवणीसाठी दुचाकीवरून जात असलेल्या दोन महिलांना उसाच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. सारिका सुतार (रा. […]
अधिक वाचा...
