
मुख्याध्यापकाचा नग्न अवस्थेत विद्यार्थिनींसोबत अंघोळ करताना व्हिडीओ व्हायरल अन्…
जयपूर (राजस्थान) : एका सरकारी शाळेतील 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सहल काढण्यात आली. मुलींना पोहण्याचे धडे देण्याच्या नावाखाली मुलांना सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका धरणावर नेण्यात आल्यानंतर विद्यार्थिनींसोबत नग्न अवस्थेत अंघोळ करताना मुख्याध्यापकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अलवर शहरात संतापची लाट पसरली आहे.
व्हिडीओमध्ये शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थिनींसोबत धरणाच्या पाण्यात कपडे न घालता अंघोळ करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी शाळेत जाऊन जाब विचारला. एवढंच नाहीतर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागानेही या व्हिडीओ पाहून मुख्याध्यापकाची चौकशी सुरू केली आणि निलंबित केलं आहे.
View this post on Instagram
अलवरच्या थानागाझी परिसरातील सरकारी शाळेचा तो मुख्याध्यापक आहे. 15 ऑगस्टला शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम पार पडल्यानंतर मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना जंगलातून सुमारे दोन किलोमीटर दूर असलेल्या भाडज धरणावर घेऊन गेला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मुलांना सहलीवर नेले जाईल आणि पोहण्याचे धडे दिले जातील, असे मुख्याध्यापकाने सांगितले होते. या धरणावर 20 ते 25 मोठ्या विद्यार्थिनीदेखील उपस्थित होत्या.
संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला आणि गावात चर्चेचा विषय बनला. शिक्षण विभागाने जारी केलेल्या एका आदेशात म्हटले की, थानागाझी येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य विद्यार्थिनींसोबत धरणात अंघोळ करत असल्याचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विभागाने प्रथमदर्शनी हे प्राचार्यांसाठी असलेल्या नैतिक आचारसंहितेच्या नियमांच्या विरुद्ध असल्याचे मानले आहे. या आधारावर, प्राचार्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कालावधीत, प्राचार्यांचे मुख्यालय बिकानेर येथे असेल.
पोलिस आणि शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. थानागाझी पोलिस ठाण्याचे प्रभारी राजकुमार मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकांचा जबाब नोंदवला. अद्याप कोणत्याही विद्यार्थी, पालक किंवा विद्यार्थ्याकडून लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुख्याध्यापिकेवर २७ वार करत विद्यार्थ्याने संपवलं; बाबू शब्दामुळे अडकला…
मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
कोल्हापूर! मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार…
मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…
मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी…

