पुणे शहरातील कसबा पेठ हादरली! नवऱ्याने दाबला रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर अन्…

पुणेः शहरातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ पती-पत्नीतील कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर, पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत पतीच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पतीने खरोखरच स्वत:वर गोळी झाडून घेतली का, याबाबत पोलिसांना शंका आहे. त्यामुळे या घटनेचा खोलवर तपास चालू आहे,.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये झालेला वाद इतका तीव्र झाला की, दोघांनीही एकमेकांना गोळी मारण्याबाबत बोलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पत्नीने पतीला कथितरित्या ‘स्वतःला गोळी मार’ असे सांगितल्याची, तर पतीने पत्नीला ‘मलाच गोळी मार’ असे म्हटल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान गोळीबार झाला आणि पतीच्या उजव्या हाताला गोळी लागली. जखमी पतीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पत्नीही रुग्णालयात दाखल झाल्याचे समजते. तिची चौकशी झाल्यानंतर या घटनेचा अधिकचा तपशील प्राप्त होण्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग, एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून शस्त्रासह इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. पती-पत्नीमधील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, गोळी कोणी झाडली, शस्त्र कोणाच्या ताब्यात होते आणि गोळीबार नेमका कसा झाला, याचा फरासखाना पोलीस तपास करत आहेत. सध्या पतीच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. आता पुढील तपासातून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पुणे! व्हॉट्सऍप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून विद्यार्थ्याची हत्या…

पुणे! ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस? एक्स बॉयफ्रेंडवर कोयत्यानं हल्ला…

हृदयद्रावक! पुणे शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना…

पुणे शहरातील पबमध्ये पार्टी रंगली असतानाच पोलिसांची अचानक धाड अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!