राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात ट्विस्ट…

पुणे : राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळाहून बेपत्ता झाला आहे. यानंतर पोलीस कंट्रोल रूमला अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर तानाजी सावंत हे लगेच विमानतळावर पोहोचले आहेत.

माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 4.57 वाजता स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाले अशी माहिती आहे.

पुणे शहरातील सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. स्वीफ्ट मोटारीमधून चार जण उतरले आणि त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपास सुरू केला आहे.

दरम्यान, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून तानाजी सावंत यांचा मुलगा दुपारी सव्वाचार वाजता घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो चार्टर फ्लाईटने बँकॉकला गेल्याची माहिती आहे. या सगळ्या प्रकरणात तानाजी सावंत यांनी त्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली गेली होती. पण प्राथमिक माहितीनुसार ऋषीराज सावंत याचे घरी काही वाद झाले होते, यानंतर तो बँकॉकला गेल्याचे समजत आहे. यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. तानाजी सावंत हे सतत पोलिसांच्या संपर्कात आहेत.

ऋषीराज सावंत बँकॉकला गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्यामुळे पोलिसांकडून विमान कंपनीशी संपर्क साधला जात आहे. बँकॉकला जाणारं हे चार्टर प्लेन भारताच्या हद्दीत असेल तर भारतातल्या विमानतळावरच उतरवले जाणार आहे. सिंहगड पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थरारक! चिमुकल्याची अपहरणानंतर सुटका; पोलिसांनी शेतातून काढली आरोपींची वरात…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!