सोलापूर! रुग्णालयात उपचार घेत असलेल्या युवतीचा विनयभंग…

सोलापूर: सोलापूर शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका तरुणीचा तेथीलच एका कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सोलापूर शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात पीडित युवती उपचारासाठी ॲडमिट होती. रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने तरुणीशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित युवतीने तत्काळ याबाबत नातलगांना माहिती दिली. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा सोलापूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्याविरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर घाबरलेला आरोपी कर्मचारी रुग्णालयातून पसार झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, फरार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून, पोलिस या प्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत.

रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाची आत्महत्या; एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा…

धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…

नागपूर! चिमुकलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्याला बेदम चोप; ; उपचारादरम्यान मृत्यू…

राजधानी हादरली! IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून केली हत्या…

सोलापूर! पोलिस पत्नीने शेवटचा मेसेज करून उचललं टोकाचं पाऊल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!