
हूती बंडखोरांचा सौदी अरेबियातील दोन विमानतळांवर हल्ला; तीन जण ठार, तर ३६ जखमी…
रियाधः सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनानुसार, सौदी अरेबियातील दोन विमानतळांवर हुतींनी केलेल्या हल्ल्यांमध्ये तीन नागरिक ठार आणि ३६ जण जखमी झाले आहेत. रियाधमधील आभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आहेत.
आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्यात मोरोक्को आणि अल्जेरिया येथील दोन महिलांचा मृत्यूमुखी पडल्या आणि २८ जण जखमी झाले, अशी माहिती प्राधिकरणाने दिली आहे.
राजधानी रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात एका सुदानी नागरिकाचा मृत्यू झाला आणि पाच सौदी नागरिकांसह आठ रहिवासी जखमी झाले. नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि प्रवासी व कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याकरिता ते संबंधित सुरक्षा प्राधिकरणांसोबत समन्वयाने काम करत आहेत.
सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीचे प्रवक्ते, मेजर-जनरल तुर्की अल-मलिकी यांनी सांगितले की, सैन्याने रियाधच्या उत्तरेला एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रोखले आणि येमेनची राजधानी सना येथील एक प्लॅटफॉर्म नष्ट केला. त्याचा वापर सौदीच्या राजधानीवर हल्ले करण्यासाठी केला जात होता.
यापू्र्वी रियाध विमानतळाजवळ सौदीच्या सरकारी मालकीच्या अरामको तेल कंपनीच्या इंधन टाक्या आणि इतर उपकरणांभोवती या आठवड्यात पिंजऱ्यासारखे नवीन कुंपण उभारण्यात आले आहे. १८ सप्टेंबर रोजी, सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सैन्याने सांगितले, की त्यांनी येमेनमधून रियाधमधील विमानतळाच्या दिशेने डागलेले हूतींचे एक संशयित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रोखून नष्ट करण्यात आले.
एका दिवसानंतर, १९ सप्टेंबर रोजी, रियाधमधील विमानतळाजवळ किमान एका स्फोटाचा आवाज ऐकू आला आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंधन साठवणूक क्षेत्रातून काळ्या धुराचा मोठा लोट वर जाताना दिसला.
सौदी-समर्थित येमेनी सैन्य आणि इराण-समर्थित हूती सैन्य यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे. हूती सैन्याने तांबड्या समुद्राला एडनच्या आखाताशी जोडणाऱ्या मोक्याच्या बाब अल-मंदेब सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंचा मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे.
येमेनच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारने सांगितले की, हूतींनी बुधवारी पहाटे एडन विमानतळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. त्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, रियाधमधील अमेरिकेच्या दूतावासाने विद्यमान परिस्थितीमुळे सौदी अरेबियातील अमेरिकी नागरिकांसाठी आणखी एक सुरक्षा सूचना जारी केली असून, सर्व अमेरिकी नागरिकांना अधिक सतर्कता बाळगावी, असे त्यात म्हटले आहे.

