मंत्रालयातील उच्च पदावरील महिला अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा; मला तुझ्याशी लग्न करायचंय…

मुंबईः मंत्रालयात काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला मेट्रिमोनिअल साईटवरून जोडीदार शोधणं महागात पडले असून, तिची १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेनं तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला या मंत्रालयातील एका विभागात अधिकारी म्हणून सेवेत आहेत. योग्य जोडीदाराच्या शोधात त्यांनी लग्न जुळवणाऱ्या मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर आपलं प्रोफाईल बनवलं होते. या प्रोफाईलच्या आधारे सुनील नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. आपण युकेचे नागरिक असून लग्नासाठी इच्छुक असल्याचे सांगत त्याने सागरिका यांना सांगितले. काही दिवस ऑनलाइन चॅट करून आरोपीने विश्वास संपादन केला. त्यानंतर भेटवस्तू, कस्टम क्लिअरन्स आणि विविध वैयक्तिक कारणांचे बनाव रचून त्याने सागरिका यांच्याकडून ऑनलाईन पैसे उकळण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, विशाल नावाच्या दुसऱ्या एका भामट्यानेही सीमा यांच्याशी संपर्क साधला. त्याने स्वतःला कॅनडाचा रहिवासी असल्याचे भासवले आणि लग्नाची तयारी दर्शवली. त्यानेही सीमा यांच्याकडून मोठी रक्कम ऑनलाईन वर्ग करून घेतली. या दोन्ही आरोपींच्या भुलथापांना बळी पडून सागरिका यांनी टप्प्याटप्प्याने तब्बल १७ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली. मात्र, वारंवार पैशांची मागणी होऊ लागल्याने आणि लग्नाबाबत टोलाटोली सुरू झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे सागरिका यांच्या लक्षात आले.

दरम्यान, मुंबईच्या दक्षिण प्रादेशिक विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही भामट्यांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून, बँक खाते क्रमांक आणि फोन नंबर्सच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

लग्नासाठी कुटुंब कोल्हापुरात दाखल झाले अन् मिळाली धक्कादायक माहिती…

लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…

लखोबा लोखंडे! विधवा महिलेशी लग्न अन् सोनं, चांदी पैसे घेऊन पळाला…

लखोबा लोखंडे! पोलिस फौजदार असल्याचे सांगून केली पाच लग्न अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!