एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; पाहा नावे…

पुणे : पुण्यातील एस.एम जोशी पूलावर आंदोलन करणाऱ्या 15 जणांविरुद्ध अखेर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आंदोलन करण्यासाठी पोलिसांना पत्र दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, भेटीदरम्यान त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या होत्या, त्यामुळे आंदोलन स्थगिती केल्याचे पत्र त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले होते.

परंतु सकारात्मक वाटाघाटी करून आल्यानंतरही कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक आंदोलन केले. सरकार विरोधात चितावणीखोर वक्तव्य करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि वाहतुकीस अडथळा करणे अशा विविध कलमांन्वये 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये रोहित पवार यांचा समावेश नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे…
प्रमोद पाटील
अक्षय कांबळे
अनिकेत देशमाने
प्रवीण महादेव पाटील
ऋषिकेश गांगुर्डे
प्रियंका चौधरी
नितीन गिते
सोमनाथ चव्हाण
ओंकार पाटील
गजानन शेळके
अजित काकडे
सिद्धार्थ पंचांगे
संकेत कणसे
सिद्धार्थ जांभूळकर
साहेबराव क्षीरसागर

एस.एम. जोशी पुलाजवळ आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या आणि सार्वजनिक रस्त्यावर आंदोलन केल्याचा आरोप असलेल्या १५ जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील नवी पेठ परिसरातील इंदुलाल कॉम्प्लेक्ससमोर १ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचा तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी प्रतिनिधी प्रमोद पाटील आणि इतर विद्यार्थ्यांनी आंदोलनासाठी परवानगी मिळावी म्हणून 25 सप्टेंबर रोजी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन दिले होते. अलका टॉकीज चौक, अहिल्या अभ्यासिका आणि एस.एम. जोशी पूल या तीन ठिकाणी आंदोलन करण्याचा पर्याय त्यांनी मांडला होता. चर्चेनंतर एस.एम. जोशी पुलाजवळ 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आंदोलन करण्यासाठी अटी व शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थी आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री यांची भेट घेतली. या भेटीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आणि मागण्या मान्य झाल्याने विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबरचे नियोजित आंदोलन स्थगित केल्याचे लेखी पत्र पोलीस आयुक्त कार्यालयाला दिले. त्यानंतर आंदोलनासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याचे पत्रही विद्यार्थ्यांना देण्यात आले होते.

पोलिसांच्या फिर्यादीनुसार, 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने यांच्यासह इतर विद्यार्थी नवी पेठेतील इंदुलाल कॉम्प्लेक्ससमोर सार्वजनिक रस्त्यावर जमले होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडविण्याच्या घोषणा दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जमावाला आंदोलन न करण्याच्या आणि सनदशीर मार्गाने मागण्या मांडण्याच्या सूचना दिल्या. पुणे शहरात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांची तसेच नियोजित आंदोलनाची परवानगी रद्द झाल्याची माहितीही आंदोलनकर्त्यांना देण्यात आली होती. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून आंदोलन सुरू ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने, प्रवीण महादेव पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, प्रियंका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिद्धार्थ पंचांगे, संकेत कणसे, सिद्धार्थ जांभूळकर आणि साहेबराव क्षीरसागर या 15 जणांची नावे फिर्यादीत नमूद आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली. पुणे शहरात 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना तसेच शास्त्री रोड आणि परिसरात आंदोलन, सभा, मोर्चे व रास्ता रोको करण्यास निर्बंध असताना आंदोलन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 189(2), 189(3), 189(5), 126(2), 223, 270 आणि 292, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 37(1), 37(3), 135, 112 आणि 117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! पोलिस अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला पळालेल्या निलेश घायवळ याला क्लिन चीट…

पुणे पोलिस ॲक्शन मोडमध्ये, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना धडाधड पाठवल्या नोटीसा…

पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…

पुणे शहरातील 11 पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!