
धक्कादायक! इंजिनिअर नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात घातला दगड…
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील हासेगाव परिसरात चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, चार वर्षांच्या चिमुकल्यासमोर त्याच्या आईची हत्या करण्यात आली. आरोपी गणेश टेकाळे फरार असून कळंब पोलिसांकडून शोध सुरू आहे.
कोमल टेकाळे असे मृत महिलेचे नाव आहे. गणेश टेकाळे असे आरोपी पतीचे नाव असून तो इंजिनिअर आहे. सध्या त्याला नोकरी नसल्याने तो सावरगाव येथे राहत होता. कळंब-येरमाळा मार्गावरील हासेगाव परिसरात ही घटना घडली. बुधवारी दोघा पती-पत्नींमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर संध्याकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास गणेश कोमलला घेऊन कळंब येरमाळा मार्गावरील हासेगाव परिसरातील शेतात घेऊन गेला आणि तिथे तिला मारहाण केली. हत्येपूर्वी आरोपीने पत्नीचा व्हिडिओ चित्रीत करून तो नातेवाईकांना पाठवला आहे. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
View this post on Instagram
पतीने व्हिडिओ चित्रीत करुन त्यामध्ये पत्नीकडून तिचे अनैतिक संबंध असल्याची कबुली घेतली. तसेच, हत्या केल्यानंतर सजा दिल्याचे स्टेटसही आरोपीने ठेवले आहेत. सगळ्यात दुर्दैवी म्हणजे चार वर्षांच्या चिमुकल्यासमोरच पित्याने त्याच्या आईची दगडाने ठेचून हत्या केली. पत्नीची हत्या करुन आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळी पंचनामा केला असून रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
विवाहित महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव…
नाशिक हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या…
नागपूर हादरलं! चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने केली हत्या…
अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून अधिकारी पत्नीची केली हत्या…
पुणे जिल्ह्यात युवकाला पत्नी अन् मुलासमोरच संपवल्याचं कारण आलं पुढे; प्रेमसंबंध…

