Video: अंबरनाथमध्ये कारने 5 जणांना ठरवून चिरडले…

अंबरनाथ: मुंबई आणि पुण्यामधील हीट अँड रन्स प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच अंबरनाथमध्ये एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका कारने पाच जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

अंबरनाथमधील जांभूळफाट्याजवळ असलेल्या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. टाटा सफारी या एसयुव्हीने एका पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारचा पाठलाग केला होता. जेव्हा फॉर्च्युनर ही रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्यानंतर या टाटाच्या कारने पाठीमागून येऊन जोराची धडक दिली. फॉर्च्युनरला धडक दिल्यानंतर एका व्यक्तीला कारने फरफटत नेले. यामध्ये संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, अपघातात ४ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी काळ्या रंगाच्या सफारी गाडीवर दगडफेक करत चालकाला चोप दिला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या कौटुंबिक वादातून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती पुढे आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार…

हिट अँड रन! BMWच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आरोपीला अटक…

हिट ऍण्ड रन! ओळख लपवण्यासाठी गाडीतच कापले केस आणि केली दाढी…

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!