उद्योगपती अनिल अंबानी यांची २,०३२ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त; परकीय चलनकायद्यांतर्गत कारवाई…
मुंबई: देशातील नामवंत उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होताना दिसून येत नाहीत. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत त्यांची ९ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यातच, रिलायन्स पॉवर लिमिटेडची भारतातील २,०३२.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) कलम ‘३७ अ’ अंतर्गत ही […]
अधिक वाचा...बँक ऑफ बडोदावर फसवणुकीचा आरोप करून ठोकला १.४४ लाख कोटी रुपयांचा दावा…
नवी दिल्लीः बँक ऑफ बडोदाच्या शेअर्समध्ये बुधवारच्या व्यवहारात ३ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे निफ्टी १०० मध्ये हा सर्वाधिक तोटा सहन करणारा शेअर ठरला. ‘एनएमसी हेल्थकेअर’चे संस्थापक बी. आर. शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात, सरकारी मालकीच्या बँक ऑफ बडोदासह इतर २५ जणांविरुद्ध सुमारे १.४४ लाख कोटी रुपयांच्या (१५ अब्ज डॉलर्स) नुकसान भरपाईचा दावा दाखल केल्यानंतर ही […]
अधिक वाचा...बाहेरच्या खोलीत आत्महत्या केलेल्या पत्नीचे पार्थिव; तर आतल्या खोलीत पती प्रेयसीसोबत; पोलिसांनी घातल्या बेड्या…
गोपेश्वर (उत्तराखंड): जिल्हा मुख्यालयाजवळील ग्वाद गंगलोल गावात कुसमादेवी नावाच्या एका महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी, पोलिसांनी पती विक्रम याच्याविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रात्री पत्नीच्या निधनामुळे शोक करत असलेल्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी, आरोपीला घरातील दुसऱ्या खोलीत त्याच्या दुसऱ्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले. गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शांततेचा भंग केल्याबद्दल पोलिसांनी पतीला तुरुंगात […]
अधिक वाचा...निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपीला अटक…
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथील एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका कंत्राटी कामगाराला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. ही घटना १० ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११:०७ वाजता घडल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये, ती […]
अधिक वाचा...फ्रँकफर्टहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडिया विमानाचे जयपूरला आपत्कालीन लँडिंग; सर्वत्र हाय अॅलर्ट…
जयपूरः फ्रँकफर्टहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर, सुरक्षेच्या कारणास्तव विमान त्वरित जयपूर विमानतळावर उतरवण्यात आले. आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर प्रवाशांना उतरवण्यात आले आणि विमान सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून विमानाची कसून तपासणी करण्यात येत असून, बॉम्बच्या धमकीतील सत्यता पडताळून पाहण्यात येत आहे. बुधवारी सकाळी फ्रँकफर्टहून दिल्लीकडे येणारे एअर इंडियाचे […]
अधिक वाचा...गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वैशालीमध्ये १३ मुलांचा बुडून मृत्यू; बेपत्ता लोकांचा शोध चालू…
वैशाली: बिहारमधील वैशाली येथे गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातात, १३ मुलांचा मृत्यू झाला असून, बेपत्ता झालेल्यांचा प्रवाशांचा शोध चालू आहे. आणखी मृतदेह न सापडल्याने मृतांचा आकडा १३ वरच कायम आहे. सर्व मृत व्यक्ती १५ वर्षांखालील मुले होती, असे वैशालीच्या जिल्हाधिकारी वर्षा सिंह यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी रात्री सुमारे साडेआठ […]
अधिक वाचा...शासकीय नोकरी असल्याची थाप मारून केले लग्न; परंतु चार महिन्यात पत्नीची आत्महत्या; छत्रपती संभाजीनगर हादरले…
छत्रपती संभाजीनगरः येथील हडको परिसरातील वानखेडेनगरमध्ये संजना नीलेश शेजवळ (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीकडून फसवणूक आणि सासरच्या लोकांकडून छळ करण्यात आल्याचा आरोप संजनाच्या माहेरच्यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे शासकीय नोकरीची थाप मारून लग्न केल्याचा आरोप, पती निलेश शेजवळ याच्यावर करण्यात आला आहे. मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचाही संशय माहेरच्यांनी व्यक्त […]
अधिक वाचा...जंतर मंतरवर अनधिकृत आंदोलन; सौरभ दास व आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी…
नवी दिल्लीः कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) कार्यकर्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे जबरदस्तीने बेकायदा आंदोलन केल्याबद्दल, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दिल्ली न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अजिंक्य शिंदे याची सुटका करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे कार्यकर्ते सौरभ दास आणि […]
अधिक वाचा...ठाण्यातील हॉटेलवर छापा घालून टीव्ही अभिनेत्रीची सुटका; महिलांना वेश्याव्यवसायात ओढण्याचा कट…
ठाणेः जिल्ह्यात मानवी तस्करी आणि देहविक्रीच्या कथित रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत हिंदी दूरचित्रवाणी मालिका आणि वेब मालिकांमध्ये काम केलेल्या ३५ वर्षीय अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे. मनोरंजन क्षेत्रात काम मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलांना या जाळ्यात ओढले जात असल्याचा आरोप आहे. एका स्वयंसेवी संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. […]
अधिक वाचा...प्रकृती अस्वास्थ्यानंतरही सुटी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; अशोक उईके यांची शाळेला भेट…
गडचिरोली: गडचिरोलीतील एका आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी साप चावल्याने तीन मुलींना जीव गमवावा लागला होता. सरकारनेही या घटनेची गांभीर्याने दखल घेत संबंधित आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांसह संचालकांवर कारवाई केली होती. आता, पुन्हा एकदा गडचिरोलीतील दुसऱ्या आश्रमशाळेतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रकृती बरी नसल्याने एका विद्यार्थिनीला सुटी न दिल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे शिक्षण […]
अधिक वाचा...
