
लोणावळ्यात युवतींसोबत अश्लील डान्स; 10 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांचे आवाहन…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा येथे रात्री अपरात्री गोंधळ घालणा-या हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी कारवाई केली आहे. चार नर्तिकासह १० जणांवर गुन्हा दाखल करणअयात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील एस ४ नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही जण सार्वजिनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरा पर्यंत साऊंड सिस्टम लावुन मोठमोठ्याने गाणी लावून त्यांनी सोबत आणलेल्या मुलींकडून अश्लिल हावभाव करुन नाच करायला लावत आहेत, अशी गोपणीय बातमी सहा. पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना प्राप्त झाली होती. त्यांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी व लोणावळा शहर पोलिस स्टेशन यांचेकडील पोलिस स्टाफ यांची संयुक्त टिम तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी एस ४ नावाच्या बंगल्यावर छापा टाकुन अश्लिल हावभाव करुन साऊंड सिस्टम लावून मोठमोठ्याने गाणी लावून नाच करुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असलेल्या एकुण ९ जणांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातील साउंड सिस्टम जप्त करुन त्यांचेवर लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या ताब्यातील साउंड सिस्टम जप्त करुन त्यांच्यावर लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे भा.द.वि. कलम 294, 34, महाराष्ट्र पोलिस कायदा 33 (एन), 131 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
लोणावळा शहर व परिसरातील बंगले मालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांचेकडील बंगला भाड्याने देताना त्यांचे बंगल्या मध्ये कोणतेही बेकायदेशीपणे कृत्य होणार नाहीत याची दक्षता घेतील व बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलिस स्टेशनला सादर करतील अन्यथा त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सत्यसाई कार्तिक व सुहास जगताप पोलिस निरीक्षक लोणावळा शहर पोलिस स्टेशन यांचेकडुन करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे लोणावळा शहरातील भाड्याने दिले जाणा-या बंगल्याची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलिस स्टेशन कडुन करण्यात येत आहे तरी ज्यांचे बंगले भाड्याने दिले जात आहे, त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधुन आपल्या बंगल्याची माहिती सादर करावी.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक कज देशमुख यांचे आदेशान्वये व अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलिस अधिक्षक सत्यासाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक सुहास जगताप लोणावळा शहर पोलिस स्टेशन यांचे सुचना नुसार पोसई श्रीकांत जोशी, पोहवा / आबनावे, पोना/शिंदे, पोशि/ सोनवणे मपोशि/ निंबाळकर, पोशि/ ९० शिंदे, पोशि/ येळवंडे चापोहवा / घोंगडे, चापोना / पवार यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोसई श्रीकांत जोशी हे करीत आहेत.
Video: लोणावळा येथे अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर कारवाई; पाहा नावे…
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एकाला पाठलाग करून पकडले अन्…
लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…
आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई…
सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

