धक्कादायक! पत्नीचे नको त्या अवस्थेतील फोटो पाहून नवरा हादरला…

छत्रपती संभाजीनगर : एकाने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट बनवून विवाहितेचे अश्लील फोटो पोस्ट केले असून, त्याने पीडितेचे फोटो तिच्या पतीसह भाऊ आणि इतर नातलगांना पाठवले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

विवाहितेचे (वय ३०) फोटो वापरून इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने या बनावट अकाउंटवरून अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून पीडितेची बदनामी केली. एवढेच नव्हे तर, पीडितेच्या पतीसह जवळच्या नातेवाइकांनाही विकृत मेसेज पाठवून त्यांचा मानसिक छळ केला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या पतीला ४ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात अकाउंटवरून मेसेज आणि फॉलो रिक्वेस्ट आली होती. पतीने जेव्हा हे प्रोफाइल तपासून पाहिले, तेव्हा त्यावर पत्नीचे फोटो वापरून तयार केलेल्या रील्स आणि स्टोरीवर अत्यंत विकृत मजकूर लिहिलेला दिसून आला. त्यानंतर संबंधित विवाहितेने हे खाते आपले नसल्याचे स्पष्ट केले. पतीने या फेक अकाउंटवर मेसेज करून विचारणा केली असता, आरोपीने त्यांना उलट शिवीगाळ व धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने विवाहितेचा भाऊ व इतर जवळच्या नातेवाइकांनाही फॉलो रिक्वेस्ट पाठवून त्यांच्यापर्यंत बदनामीकारक मजकूर पसरवला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन कुंभार करत आहेत.

पीडित महिलेच्या पतीने फेक अकाउंटवर मेसेज करून जाब विचारल्यानंतर आरोपी सतर्क झाला. पोलिसांत तक्रार होईल किंवा आपले हे अकाउंट ब्लॉक केले जाईल, या भीतीपोटी आरोपीने ७ ऑक्टोबर रोजी या इन्स्टाग्राम अकाउंटचे युजरनेम बदलून टाकले. आपली खरी ओळख लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने ही शक्कल लढवली होती. सध्या पोलीस सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत, नको त्या व्यक्तीसोबत पाहिले अन्…

पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन् तिचे दोन प्रियकर आले…

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने बाल्कनीतून मारली उडी…

क्रिकेटपटूंसोबत परदेशी युवती आढळल्या नको त्या अवस्थेत…

पत्नीसोबत नको त्या अवस्थेत युवकाला पाहिलं अन् नवऱ्याने घेतला क्रूरपणे बदला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!